ठाणे: टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या सहा दिवसांपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या 'प्रेसिडेंट कप - २०२६' चा समारोप रविवारी संपन्न झाला. अंतिम फेरीत बिहार ब्लास्टर्स संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत पहिल्यावहिल्या 'प्रेसिडेंट कप'वर आपले नाव कोरले.
टेनिक क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ३१ मार्चपासून राष्ट्रीय स्तरावरील प्रेसिडेंट कप २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली होती. देशातील १६ विविध राज्यातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विविध साखळी सामन्यातून बिहार आणि उत्तरप्रदेश हे संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अखेर चुरशीच्या सामन्यात बिहार ब्लास्टार्स संघाने विजय मिळवला.
विजेत्या बिहार ब्लास्टर्स संघाचे अभिनंदन करतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे आणि आयोजक समितीच्या नियोजनाचे कौतुक केले. क्रीडा रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे बक्षीस स्वरूप अत्यंत भव्य ठेवण्यात आले आहे. विजेत्या संघाला १ कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला ५० लाख रुपये इतकी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आले.ग्रामीण भागातील आणि टेनिस क्रिकेटमधील गुणवान खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळून त्यांना प्रेरणा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
विजेतेप्रेसिडेंट कप विजेते - बिहार प्लास्टर्सउपविजेते - युपी नाईट्ससर्वोत्कृष्ट फलंदाज - केतन म्हात्रे, महाराष्ट्र वॉरियर्ससामनावीर - विशाल सिंग, बिहार ब्लास्टर्समालिकावीर - मोहित स्टार्कसर्वोत्कृष्ट गोलंदाज - सुरेंदर सैनी, राजस्थानी योद्धाससर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू - सरताज अलीहॅटट्रीक - पंकज पार्थ बिहार प्लास्टर्स
Web Summary : Bihar Blasters won the first 'President Cup - 2026' in Thane, defeating Uttar Pradesh in a thrilling final. The champions received ₹1 crore, with ₹50 lakh for the runners-up. Dr. Shrikant Shinde praised the players and organizers, highlighting the event's aim to support talented rural cricketers.
Web Summary : बिहार ब्लास्टर्स ने ठाणे में 'प्रेसिडेंट कप - 2026' का पहला खिताब जीता, फाइनल में उत्तर प्रदेश को हराया। विजेताओं को ₹1 करोड़ और उपविजेताओं को ₹50 लाख मिले। डॉ. श्रीकांत शिंदे ने खिलाड़ियों और आयोजकों की प्रशंसा की, ग्रामीण क्रिकेटरों को समर्थन देने के उद्देश्य पर प्रकाश डाला।