शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना घरे न देणाऱ्या महापालिकेला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 01:04 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतील घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनास दिले आहेत.

कल्याण : केंद्र सरकारच्या जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पातील ८४० प्रकल्पबाधितांना कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतील घरे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनास दिले आहेत. महापालिकेच्या महासभेत हा विषय स्थगित होता. महापालिकेकडून मुदत पाळली गेली नाही. त्यामुळे सरकारने त्या निर्णयाला मंजुरी देत एक अध्यादेशच जारी केला आहे. प्रकल्पबाधितांना घरे देण्यात सत्ताधाऱ्यांमुळे विलंब होत होता, असा आरोप मनसेने केला असून त्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मनसेचे गटनेते मंदार हळबे यांच्यासह मनसे नगरसेविका सरोज भोईर यावेळी उपस्थित होत्या. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात कल्याण-डोंबिवली हद्दीतील बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी भोईर यांनी पाठपुरावा केला होता. हा विषय त्यांनी महासभेत मांडला होता. महासभेत ८४० प्रकल्पग्रस्तांना घरे देण्याच्या विषयाला मंजुरी दिली गेली नाही. हा विषय स्थगित ठेवला होता. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आधी महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच अन्य प्रकल्पांतील बाधितांचा विचार करावा. अन्य प्रकल्पग्रस्तांचा विचार न करता रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यास विरोध केला होता. त्यामुळे हा विषय स्थगित होता. महापालिकेकडे राज्य सरकारने मंजुरी मागितली होती. त्याला महापालिकेने विहीत कालावधीत मंजुरी दिली नसल्याने राज्य सरकारने स्वत:च्या अधिकाराचा वापर करीत त्याला मंजुरी दिली.दरम्यान, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प बाधितांना महापालिकेने तीन हजार ५१५ सदनिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात १६०० सदनिका देण्याची व तातडीने ८४० सदनिका द्याव्यात, ही विनंती केली होती. बीएसयूपी योजनेत बांधकाम केलेल्या व बीएसयूपी योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना द्यायच्या सदनिका वगळून शिल्लक राहिलेल्या सदनिकांपैकी पहिल्या टप्प्यात ८४० सदनिका द्याव्यात. फ्रेट कॉरिडॉरकडून मोबदला महापालिकेस दिला जाणार आहे. निधी महापालिकेस प्राप्त होताच सदनिका हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे नगरविकास खात्याचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी आदेशात म्हटले आहे.>मनसेचा पुढाकारमनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या पुढाकाराने प्रकल्प अधिकाºयाची अलीकडेच भोईर यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात भेट घेतली होती. त्यावेळी हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकाºयांनी दिले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका