शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बॅडमिंटन शिबिरास मोठा प्रतिसाद

By admin | Updated: April 18, 2016 01:11 IST

सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारे ठाणे शहर आता क्रीडानगरी बनू पाहत आहे. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने

मुंबई : सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारे ठाणे शहर आता क्रीडानगरी बनू पाहत आहे. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या साथीने सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी बॅडमिंटनपटू मनोहर गोडसे व पॉवर लिफ्टर सतीश पाटाडे यांचा गौरव करण्यात आला.ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त एस. पी. पाटणकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही यावेळी खेळाडूंशी संवाद साधला. ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने राज्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रसाराच्या सन्मानार्थ बॅडमिंटनपटू मनोहर गोडसे, पॉवर लिफ्टर सतीश पाटाडे व भारत श्री गिरीश शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. ‘हल्लीची तरुणाई मैदानी खेळापेक्षा सोशल मीडियात जास्त रमते. त्यामुळे तरुणपिढी नैराश्येच्या जाळ््यात ओढली जाते. म्हणूनच तरुणांनी सोशल मीडियापेक्षा मैदानी खेळाकडे वळावे,’ असा सल्ला पाटणकर यांनी दिला.१५० खेळाडूंचा सहभागमहाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान, गुजरात, बंगाल, तसेच सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील १५० खेळाडंूनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. खेळाडूंसाठी दर्जेदार प्रशिक्षकांची फौज सज्ज असून, गुणवान खेळाडू घडवण्यासाठी अकादमी वचनबद्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले.