शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भिकाऱ्यांच्या लसीकरणाचा मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 23:43 IST

कागदपत्रांची वानवा : तोडगा काढण्याची यंत्रणेने व्यक्त केली गरज

अजित मांडके

ठाणे  : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, याच जिल्ह्यात रस्त्यावर, मंदिराशेजारी, फुटपाथवर, रेल्वेत, सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचे लसीकरण कसे करायचे, असा पेच शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे ना धड पॅनकार्ड ना आधारकार्ड, मग नोंदणी कशी करायची, लस कशी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. परंतु, या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे जिल्हा यंत्रणा सांगत आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे वयोगटापुढील मात्र त्यांना काही आजार असल्यास त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करताना आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक पुरावा म्हणून मागितला जात आहे. त्यानंतरच लसीकरण केले जात आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात आज शेकडो भिकारी सिग्नलवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, मंदिराबाहेर भीक मागताना दिसत आहेत. या भिकाऱ्यांसाठी ठाण्यात एक शेल्टर होम बांधले आहे, तर जिल्हा यंत्रणाच्या माध्यमातून जांभूळगाव येथे एक शेल्टर होम आहे. त्याठिकाणी ७४ भिकारी वास्तव्यास आहेत. यामध्ये ठाण्याच्या शेल्टरमध्ये २० आणि जांभूळगाव येथील शेल्टरमध्ये ५४ जणांचे वास्तव्य आहे, तर जिल्ह्यात आजडीला सुमारे ३०८ भिकारी असल्याची माहिती जिल्हा यंत्रणेच्या वतीने देण्यात आली. या भिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणारजिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जांभळूगाव येथे असलेल्या शेल्टर होममध्ये असलेल्या भिकाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. परंतु, जिल्ह्यात बेवारस फिरणाऱ्या भिकाऱ्यांच्या लसीकरणासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून त्यांना सुरुवातीला पकडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना एका छताखाली आणावे लागणार. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाशी चर्चा करून कशाप्रकारे लसीकरणाच्या प्रक्रियेत आणले जाईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

ठाण्यात बेवारस नागरिकांची संख्या अधिकठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बेवारस नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यातही ठाण्यात आजघडीला २०१८ मध्ये केलेल्या सर्व्हेत १५८ भिकारी असल्याची नोंद आहे, तर कल्याण, डोंबिवलीत ६७, उल्हासनगर ५६ आणि भिवंडीत ६७ भिकारी असल्याचे समोर आले आहे. 

भिकाऱ्यांना लसीकरणासाठी आधी त्याचे नियोजन आखावे लागणार आहे. यासाठी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची मदत घेऊन या भिकाऱ्यांना पकडून त्यांना शेल्टरमध्ये आणावे लागेल. नंतर जिल्हाधिकारी, महापालिका यांच्याशी चर्चा करून भिकाऱ्यांना लसीकरण कसे करता येऊ शकेल, याची मोहीम हाती घ्यावी लागेल.     - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या