शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जागांवर आपसांत नगरसेवकांचीच बिग फाइट

By admin | Updated: February 16, 2017 01:53 IST

युती तुटल्याने आणि आयारामांच्या गोंधळामुळे परस्परांचे मित्र असलेले विद्यमान नगरसेवक आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ठाणे : युती तुटल्याने आणि आयारामांच्या गोंधळामुळे परस्परांचे मित्र असलेले विद्यमान नगरसेवक आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात शत्रुपक्षावर तुटून पडण्याकरिता ते सिद्ध झाले आहेत. त्यानुसार, १३१ जागांपैकी ९ जागांवर आता विद्यमान नगरसेवक एकमेकांना भिडणार आहेत. यामध्ये नौपाडा, मुंब्रा आदी भागांत दोघा नगरसेवकांमध्ये बिग फाइट पाहावयास मिळणार आहे.२१ फेब्रुवारीला ठाणे महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. यात जनताजनार्दन कोणावर कृपादृष्टी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या वतीने येथे अ मधून माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक हरिश्चंद्र पाटील हे रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपाचे विद्यमान नगरसेवक मुकेश मोकाशी आहेत. पाटील यांची ही सलग तिसरी टर्म असून मोकाशी यांची ही दुसरी टर्म असल्याने या बिग फाइटमध्ये कोण चौकार मारणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशीच लढत प्रभाग क्रमांक ५ ड मध्ये होत असून या ठिकाणी सुधाकर चव्हाण हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते अपक्ष असून त्यांना टक्कर देण्यासाठी सेनेच्या विद्यमान नगरसेविका परिषा सरनाईक मैदानात आहेत. तिसरी लढत ही रिपाइंच्या एकतावादी गटाच्या नगरसेविका रेखाबाई इंदिसे यांची आणि राष्ट्रवादीच्या राधाबाई जाधवर यांच्यात होणार आहे. ही लढत प्रभाग क्रमांक ६ क मध्ये होत आहे. तर, याच प्रभागातील ड मध्ये स्वीकृत नगरसेवक नागसेन इंदिसे यांची लढत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्याशी होणार आहे. प्रभाग क्रमांक ११ ड मध्ये सेनेच्या विद्यमान नगरसेविका अनिता बिर्जे यांची लढत भाजपाचे मिलिंद पाटणकर यांच्याशी होणार आहे. प्रभाग क्रमांक १७ ड मध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक तथा रिपाइं (आठवले गटाचे शहराध्यक्ष) रामभाऊ तायडे यांची लढत शिवसेनेचे योगेश जाणकर यांच्याशी होत आहे. सहावी लढत ही प्रभाग क्र. २० ड मध्ये पाहावयास मिळणार असून येथे जायंट किलर म्हणून सुपरिचित भाजपाचे भरत चव्हाण यांची लढत सेनेचे गिरीश राजे यांच्याशी होईल. (प्रतिनिधी)