शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नो फन फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकलचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 01:15 IST

उत्पादकांना ग्राहक मिळवून देणे हा उद्देश

बदलापूर : बदलापूर येथील भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टेक्नो फन फेअर झाले. या फेअरमध्ये सौरऊर्जेवरील सायकल सर्वांचे आकर्षण ठरली. या सोबत अनेक यंत्र या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.रोबोट फुटबॉल, काऊंटर स्ट्राईकबरोबरच सौरऊर्जेवर एकाचवेळी ५० किलोमीटर धावणारी सायकल, सायकलवरील विजेचा बल्ब, सायकलने फिरणारे मिक्सर, दरवाजा उघडा राहिल्यास वाजणारी अलार्म यंत्रणा, आपत्तीच्यावेळी उंच इमारतीवरून सुटका होण्यासाठी स्काय सेव्हर आदी वैशिट्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी संधी देण्याबरोबरच नावीन्यपूर्ण उत्पादनांना ग्राहक मिळवून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे झालेल्या टेक्नो फन फेअरचे उद्घाटन सोमवारी झाले.सौरऊर्जेवरील सायकलची किंमत ३० हजार असून, ती प्रतीतास ४० किलोमीटर धाऊ शकेल. या सायकलची क्षमता एकाचवेळी ५० किलोमीटर धावण्याची आहे. प्रत्येक मजल्यावर फायर रोप लावल्यास रहिवाशांची वेगाने सुटका करता येईल. या प्रकल्पांबरोबरच रोबोट फुटबॉल, अत्यल्प काळात थ्रीडी प्रिटींग करणारी यंत्रणा, ड्रोन मागील संपूर्ण तंत्रज्ञानाच्या माहितीबरोबरच ड्रोन हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.भारत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बायोगॅसवर चालणाऱ्या दुचाकीचे इंजिन तयार केले आहे. अशा प्रकारची इंजिन तयार केल्यास पेट्रोलऐवजी बायोगॅसचा वापर करून इंधन खर्चात बचत करता येईल असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. गुरूवारपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. सकाळी दहा ते चार यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या कार्यक्र माला वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार जयेश खाडे, हरीश अय्यर, प्रकाश पै, एस. एस. ठाकूर, संदीप कुलकर्णी, संस्थेचे सचिव प्रा. संदीप सहारे, विश्वस्त प्रा. श्रीमती एस. एस. हेगडे, प्राचार्य एस. एन. बराई आदी उपस्थित होते.सोशल मीडिया फार चांगली संधीडिजिटल मार्केटिंगसाठी चांगली सरकारी योजना आली आहे. स्टार्टअप साठी कोणीही संधी उपलब्ध करून देत नाही, आम्ही ती संधी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडिया ही फार चांगली संधी आहे. या माध्यमातून चांगला व्यवसाय करू शकतो असे मत वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार जयेश खाडे यांनी स्पष्ट केले.