शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेसाठी डोंबिवलीच्या तरुणाची भारतभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:08 IST

करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात.

डोंबिवली : करिअर सल्लागारांपासून नामवंत व्यक्ती या नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरतात. मात्र, तरीही पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडेच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घ्या आणि मातृभाषेचा अभ्यास करा, असा संदेश देण्यासाठी डोंबिवलीतील गंधार कुळकर्णी यांनी ५०० दिवसांची सायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखली आहे. ती पूर्ण झाल्यावर भाषा अध्यायन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे आणि नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.गंधार हे १ जुलैला डोंबिवलीहून या भ्रमंतीला प्रारंभ करतील. १२ जुलैपर्यंत ते नागपूरला पोहोचतील. त्यापुढे १३ जुलैला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गाने रामटेकहून निघून हरिद्वारला जाणार आहेत. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणारा, असा त्यांनी पुढचा मार्ग आखला आहे. या संपूर्ण प्रवासात ते २० हजार किलोमीटर सायकल चालविणार आहेत. दररोज एका शाळेत दीड ते दोन तास जाऊन ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी ‘भाषेचे अध्ययन आणि अध्यापन’ या विषयावर संवाद साधणार आहेत. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा, यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वत:च्या भाषेविषयी जाणीव करून देणे, स्थानिक बोलींची ओळख व्हावी, यावर त्यांचा भर असणार आहे. तसेच त्यासाठी शब्दांची एक यादी त्या-त्या बोलीत अनुवादित करून घेणे, भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्याच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघावे, याची जाणीव ते या मोहिमेत करणार आहेत.प्रयोगशीलतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे केवळ नोकरदार वर्ग निर्माण होत आहे. शिक्षणाचे हे स्वरूप बदलले पाहिजे, असे कुलकर्णी म्हणाले. या मोहिमेत त्यांनी घरगुती निवासाची व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे सामानाची आणि स्वत:ची सुरक्षितता ठेवता येणार आहे. आपल्या भारतात ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती रूजलेली असल्याने या पद्धतीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम.एची पदवी मिळवली आहे. या विभागाने त्यांच्या या मोहिमची दखल घेतली आहे. ज्ञानप्रबोधिनी, डोंबिवली विस्तार केंद्राचा या मोहिमेत मोठा वाटा आहे. एका जर्मन कंपनीने त्यांना ३४ हजारांची हेलिक्स ३.५ आय ही सायकल देऊ केली आहे. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदत ही प्रवासादरम्यान होणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचे मार्गदर्शन कुलकर्णी यांना लाभले आहे. या प्रवासात २०० शाळांना भेटी देण्याचा मानस आहे. त्यासाठी चार लाखांचा खर्च आहे.