शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना कचरा भोवला, २३ जणांचा पगार रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 00:52 IST

कचरा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाविषयी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व प्रभाग क्षेत्र अधिकारी गंभीर नाहीत.

कल्याण : कचरा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाविषयी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व प्रभाग क्षेत्र अधिकारी गंभीर नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह २३ जणांचे पगार रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत.केडीएमसीकडून आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात दिरंगाई केली जात आहे. डम्पिंग बंद करण्यासाठी कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी प्रकल्प उभारले जात नाहीत. डम्पिंग रद्द करण्यासाठी ८ जुलैला मुख्यमंत्र्यांकडे भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्या मागणीनुसार बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या दिरंगाईविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच बोडके यांनाही फैलावर घेतले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पगार रोखा तसेच महापालिकेस दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले होते. त्यानंतर बोडके यांनी आधारवाडी डम्पिंगवर धाव घेतली होती. त्यावेळी त्यांनी डम्पिंगची पाहणी केल्यानंतर काम योग्य प्रकारे करा, अशी तंबी कामगारांना दिली. मात्र, आयुक्तांनी आता २३ जणांचे पगार बंद रोखण्याचे आदेश काढले आहेत. त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, दहा प्रभाग क्षेत्र अधिकारी, दोन साहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि दहा मुख्य आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.आयुक्तांनी या २३ जणांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, ‘महापालिका हद्दीतील कचरा वेळेवर उचलला जात नाही. स्वच्छ भारत अभियानांविषयी आपण गंभीर नाहीत. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी योग्य प्रकारे काम होत नाही. याबाबत आपल्याला जबाबदार धरण्यात येत आहे.’ मात्र, या कारवाईमुळे हे २३ जण धास्तावले आहेत. दुसरीकडे सोमवारीही आरोग्य अधिकाºयांची बैठक घेऊन पदाधिकाºयांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.>उपायुक्त अमित पंडित यांना नाहक फटकाकचरा कंत्राटदाराच्या मनमानीला लगाम घालण्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन उपायुक्त धनाजी तोरसकर असमर्थ ठरले होते. तसेच कंत्राटी कामगारांच्या पगाराची बिलेही त्यांनी सादर केली नाहीत. अखेरीस आयुक्तांनी त्यांच्याकडून घनकचरा व्यवस्थापन आणि विधी विभागाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे नगरनियोजनाचा पदभार दिला. मात्र तोरसकर यांची वर्षभरापूर्वीच बदली झाली असताना त्यांना कार्यमुक्त का केले जात नाही, असा सवाल उपस्थित केला गेला. तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी अमित पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. तोरसकर यांच्या काळात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम असधानकारक झाले. मात्र, नोटीस पंडित यांना काढल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे. ते सध्या उपायुक्त असल्याने त्यांचाही पगार रोखला जाणार आहे. या अनागोंदीला आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी हेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम केले जात नसल्याने त्यांनाही पगार बंदीची नोटीस बजावली आहे.