शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सेनेने उपसले बंडाचे हत्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती झाल्याचे काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणामही दिसत आहेत.

- शाम धुमाळ कसारा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती झाल्याचे काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणामही दिसत आहेत. युती होणार नसल्याचे गृहित धरुन ज्यांनी निवडणुकीची तयारी केली होती, त्यांची युती झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. परिणामस्वरूप, काही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांविरोधात बंडाचे हत्यार जाहीररीत्या उपसल्याने दोन्ही पक्षनेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे.भिवंडी लोकसभेच्या जागेवर भाजपा आपला हक्क सांगत असली तरी, ही बात येथील बऱ्याच शिवसैनिकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळे पक्षस्तरावर युती झाली असली तरी, स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. युतीची घोषणा झाल्यापासून शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आरोग्य समिती सभापती बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. ते सातत्याने खा. पाटील यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य करीत आहेत. मागील निवडनुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने, तेव्हापासूनच भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांची मने दुभंगली होती. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. याचा परीणाम म्हणून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये एकामेकांविरोधात संघर्षाची भावना निर्माण झाली. खा. पाटीलही यात मागे नव्हते. त्यामुळे स्थानिक शिवसेना नेते व शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी असंतोष आहे.भिवंडी लोकसभेत शिवसेनेचे वजन वाढल्याने या मतदारसंघावर शिवसेनेकडून नेहमीच दावा केला जातो. परंतु हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असल्याने खा. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांचे विरोधक बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांच्याविरोधात उघडउघड भूमिका घेतली असून, पाटीलविरोधी गटातून त्यांना पाठबळ मिळत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाbhiwandiभिवंडीBJPभाजपा