शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सतत हाेणाऱ्या वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले पुरते हैराण; पालिका, पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 23:27 IST

महत्त्वाचे म्हणजे सध्या शहरात अंजूरफाटा ते कल्याणनाका रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे.

भिवंडी : भिवंडीतील नागरिकांची वाहतूककोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने येथील नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मात्र, वाहतूक विभागासह पालिका प्रशासन या कोंडीतून नागरिकांची सुटका का करत नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

यंत्रमाग व गोदामपट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत वाहनांची सतत येजा सुरू असते. मात्र, येथील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूककोंडी होत असते. सुरुवातीला महामार्गांवर उड्डाणपुलाच्या कामांमुळे होणारी कोंडी उड्डाणपूल सुरू झाल्याने संपली असतानाच आता महामार्गांवर दुरुस्तीमुळे कोंडी होत आहे. 

महत्त्वाचे म्हणजे सध्या शहरात अंजूरफाटा ते कल्याणनाका रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे व अतिक्रमणे हटवली नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे या मार्गावर कोंडी होते. कल्याणनाका ते महापालिका मुख्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. विशेष म्हणजे हे काम करताना पालिका प्रशासन व वाहतूक विभागाचे कोणतेही तारतम्य दिसत नाही. दहा मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागत असल्याने चालकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. याच परिसरात भिवंडी पंचायत समिती, तहसीलदार, पालिका कार्यालय, टपाल कार्यालय, न्यायालय, तालुका पोलीस ठाणे व सब जेल व बसस्थानकासह अन्य सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. सध्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कोंडी होत आहे.

बस पार्किंगचा त्रासभिवंडीतील धामणकरनाका ते कॉलेज रोड या नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर मागील पाच ते सहा महिन्यांपासून किमान चार ते पाच खाजगी प्रवासी बस बेकायदा उभ्या करून ठेवल्या जात असून त्यामुळे या ठिकाणी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजपचे शहर सरचिटणीस विशाल पाठारे यांनी निवेदनात केला आहे. या बस एकाच ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा असल्याप्रमाणे उभ्या करून ठेवतात. परिणामी, साफसफाई करण्यास अडचण येत असल्याने या भागात अस्वच्छता पसरून दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे या बसवर योग्य ती कारवाई करून त्वरित हटवाव्यात, अशी मागणी पाठारे यांनी केली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी