शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: August 28, 2023 14:55 IST

कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मनपा प्रशासन कचरा उचलण्यास असमर्थ ठरली असल्याने शहरात घाण,दुर्गंधी व आजार वाढले असतांनाही मनपा प्रशासन कचरा ठेकेदारावर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप भिवंडी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आरफात खान यांनी करत थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर सोमवारी कचरा फेकून धरणे आंदोलन केले. अचानक झालेल्या या कचरा फेको धरणे आंदोलनामुळे मनपा मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती.या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इसाम खान, जावेद खान, सलीम खान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा सुमारे ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमलेला असताना सुद्धा शहरातील अनेक विभागात कचरा तसाच पडून आहे. कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

शहरातील अनेक भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शांतीनगर या अल्पसंख्याक विभागात पालिका प्रशासना दूजाभाव करीत असून गौसिया मस्जिद परिसरात कचरा उचलला जात नसल्याने पावसाळ्या मध्ये हा कचरा सडून त्या मधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या कचऱ्या मुळे काही संसर्ग आजारांची लागण सुध्दा नागरिकांना होते असल्याचा आरोप आरफात खान यांनी केला आहे.या बाबत पालिका प्रशासना कडे वेळोवेळी तक्रारी करून ही पालिका प्रशासन आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन हे आंदोलन केल्याची माहिती जावेद खान यांनी दिली आहे.सुमारे दोन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर पालिका आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभागाचे प्रमुख जे एम सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यां सोबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी