शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी ग्रामीण साठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणार

By नितीन पंडित | Updated: October 31, 2022 18:35 IST

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते.

भिवंडी, दि.३१- 

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते. त्यामुळे ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी जोर धरत असतांना आता ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशामक दल उभारले जाणार असून त्यासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुध्दा लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .केंद्रीय मंत्री पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला असून नियोजित केंद्रासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कपिल पाटील यांना दिली आहे.

 भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ३५ वर्षांपासून गोदामे वसली आहेत. जगभरातील नामांकित कंपन्यांबरोबरच हजारो कंपन्यांची गोदामे या ग्रामीण भागात आहेत. या गोदामांमध्ये मुंबई-ठाणे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. मात्र, अनेक वेळा अचानक लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये गोदामे जळून भस्मसात होत आले आहेत.या गोदामांसाठी अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे भिवंडी,ठाणे,कल्याण,उल्हासनगर  महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत होते.मात्र काही वेळा त्यांना वाहतूक कोंडी मुळे घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे गोदामांचे मोठे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी एमएमआरडीएकडे भिवंडी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती.त्यानंतर एमएमआरडीएने २०२० मध्ये अग्निशमन केंद्राला मान्यता दिली होती.परंतु कोरोनामुळे केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव लांबला होता.आता कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर एमएमआरडीएने मुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिक्षक संवर्गासह इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.या केंद्रामुळे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात व गोदाम पट्ट्यात लागणाऱ्या आगी वेळीच आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.