शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

भिवंडीचे पथक ठरले ‘तालसंग्राम’मध्ये अव्वल; डोंबिवलीकर ढोलताशाप्रेमींची तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:57 AM

फलटणच्या शिवरुद्र, गोव्याच्या जगदंब पथकांनीही मारली बाजी

डोंबिवली : आरंभ प्रतिष्ठानच्या विद्यमाने तालसंग्राम-२०२० या तिसऱ्या वर्षीच्या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला शनिवारी सावळाराम क्रीडासंकुलाच्या पटांगणात सुरुवात झाली. रविवारी या दोनदिवसीय स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न झाली. यासाठी एकूण १३ ढोलताशा पथकांपैकी सहा पथकांची निवड झाली. त्यातून तीन जणांची निवड करण्यात आली. भिवंडीचे शिवस्वरूप ढोलताशा पथक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पथकाला दीड लाख रुपयांचा धनादेश, आकर्षक ट्रॉफी आणि सांस्कृतिक संचालनालय विभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

या स्पर्धेत फलटणच्या शिवरुद्र ढोलताशा पथकाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार प्रमोद पाटील यांनी या पथकाला एक लाख रुपयांचा धनादेश, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले. गोव्याच्या जगदंब ढोलताशा पथकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. भिवंडीच्या विजयी पथकातील वादक यावेळी भावुक झाले होते. त्यांना आमदार पाटील, आमदार चव्हाण यांनी जवळ घेऊन विजयाचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी हजारो ढोलताशाप्रेमींनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत कौतुकाची थाप दिली.

उत्कृष्ट ढोलवादक म्हणून ओम माने- शिवरुद्र ढोलताशा पथक, उत्कृष्ट ताशावादक हिमांशू कुलकर्णी- तालरुद्र ढोलताशा पथक, उत्कृष्ट टोलवादक मानस वाणी- शिवस्वरूप ढोलताशा पथक आदींना १० हजार रुपयांचे पारितोषिक, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांचेही पथक यात सहभागी झाले होते. आरंभ प्रतिष्ठानच्या आयोजकांनी महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून विशेष पारितोषिक अंमळनेरच्या नादब्रह्म पथकाला जाहीर करण्यात आले. या पथकाला मनसेच्या महिला अध्यक्षा मंदा पाटील यांनी सन्मानित केले.

यंदा या स्पर्धेसाठी गोवा, अंमळनेर, फलटण, नाशिकसह ठाणे, मुंबई, कोकण भागांतून १३ पथकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये नाशिकचे तालरुद्र, बेळगावचे धाडस, अंमळनेरचे नादब्रह्म, फलटणचे शिवरुद्र, तसेच मावळे आम्ही ढोलताशांचे, छावा, शिवस्वरूप, मावळे, आम्ही कांदिवलीकर, पार्लेस्वर, बदलापूरचे शिवसूत्र, जगदंब, नादब्रह्म आदी पथकांचा समावेश होता.

या स्पर्धेला राज्य शासनाचा विशेष निधी मिळाला असून, चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीत हा दर्जा मिळवून दिला होता. त्याबद्दल आरंभ प्रतिष्ठानच्या आयोजकांनी त्यांचे आभार मानले. या क्षेत्रातील तज्ज्ञ पुण्याचे रहिवासी सुजित सोमण, गणेश गुंड-पाटील, निलेश कांबळे आदी या स्पर्धेचे परीक्षक होते. यावेळी सैनिकी स्कूलच्या कॅडेट्सना राष्ट्रासाठी काही क्षण या संकल्पनेंतर्गत सहभागी करण्यात आले होते. त्यांची मानवंदना, परेड हे क्षण पाहण्यासारखे होते.

या स्पर्धेनिमित्त बनवण्यात आलेली ३०० फुटांची लोखंडी गॅलरी यापुढे सगळ्या खेळांसाठी खुली असून ती विनामूल्य उपलब्ध असेल. ज्या संस्थांना तिचा लाभ हवा आहे, अशांनी डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार, भाजप कार्यालय तसेच आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. डोंबिवलीकरांच्या मनोरंजनाची उणीव या स्पर्धेने भरून निघाल्याचे आमदार पाटील म्हणाले.अशा स्पर्धांसाठी हवे ते सहकार्य करण्याचा शब्द नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वंडार पाटील यांनी रविवारी या स्पर्धेचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यास मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, खुशबू चौधरी, राजन मराठे, शिवाजी आव्हाड, डॉ. मिलिंद शिरोडकर, मेहुल जेठवा, कल्पेश पटेल, हेमंत पटेल, सचिन पटेल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याण