शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात भिवंडी मनपाची पाणीकपात

By admin | Updated: September 5, 2015 22:24 IST

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम व मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने दोन दिवस पाणी मिळत

भिवंडी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम व मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने दोन दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढत आहेत.शहरातील पाण्याचे स्रोत महानगरपालिका प्रशासनाने कमी केल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी स्टेम व मुंबई मनपाकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या शहरातील नागरिकांना वऱ्हाळा तलावातील दोन एमएलडी, स्टेम व मुंबई मनपा या दोन ठिकाणांहून एकूण १०८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तो करताना नियोजन नसल्याने काही ठिकाणी २४ तास तर काही ठिकाणी २ तासही पाणी सोडले जात नाही. मुंबई महानगरपालिकेने २० टक्के पाणीकपात केली आहे. तसेच दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी ९ वाजेपर्यंत स्टेमचे पाणी बंद असते. त्यानंतर, रिकाम्या जलवाहिनीतून आलेले पाणी काही ठिकाणी पोहोचण्यास उशीर लागल्याने ते शुक्रवारी पोहोचते. अशा जलवाहिनीवरील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केले पाहिजेत, अशी मागणी त्या भागातील रहिवासी करीत आहेत. प्रभाग समिती ५ मधील जुन्या भिवंडीतील रहिवाशांना नियमित पाणी देण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी अनेक ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाइंगमध्ये व सायझिंगमध्ये सोडलेले आहे. तसेच वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरधारकांनी पाणी चोरले आहे. इमारत बांधकामासही चोरीचे कनेक्शन दिले आहे.