शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:28 IST

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.

भिवंडी - महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिकाºयांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.राजीव गांधी ते टेमघर या मार्गाने मेट्रो रेल्वे जाऊ नये म्हणून साकडे घालण्यासाठी मंगळवारी कल्याणरोडच्या रहिवाशांनी महापौर जावेद दळवी यांची भेट घेतली. मागील महासभेत कल्याणरोड व वंजारपाटीनाका या दोन मार्गाने मेट्रो रेल्वे नेण्यास मान्यता दिली होती. या मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा विषय बुधवारच्या महासभेत आला असता शिवसेनेचे नगरसेवक मदनबुवा नाईक, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांच्यासह काही सेना व काँग्रेस नगरसेवकांनी कल्याण रोडवरून मेट्रो नेण्यास विरोध केला. त्यामुळे महासभेत कल्याणरोड मार्ग व वंजारपाटीनाका मार्ग असे दोन गट निर्माण झाले. तसेच सभागृहाबाहेर कल्याणरोड रहिवाशांनी गर्दी केली होती. अखेर सभागृहाने मागील इतिवृत्तास मान्यता दिल्यानंतर महासभेपुढे इतर विषयांची चर्चा झाली. राजीव गांधी चौक ते टेमघर या कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळे व इमारती उभ्या केल्या आहेत. तर वज्रेश्वरी संस्थान आणि इतर संस्थानच्या मालकीच्या जागा या मार्गावर आहेत. त्यामुळे मूळ जमिनीचा सातबारा अथवा सिटीसर्वे उताºयावर अनेक रहिवाशांची नावे नाहीत. त्यामुळे अशा काही ठराविक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात काही जमीनमालकांना व गाळे धारकांना पंचनामा तसेच नुकसानभरपाई न दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.गोदामांना लागलेल्या आगीचे महासभेत पडसादभिवंडी : गायत्रीनगरमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचे पडसाद महासभेत उमटले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने घटनास्थळी आल्याने नागरिकांचे जास्त नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक शरद धुळे आणि अहमद सिध्दीकी यांनी केला.अग्निशमन दलाचा बंब रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांना धक्का देऊन घटनास्थळापर्यंत गाडी न्यावी लागली. तसेच घटनास्थळी टँकरचे पाणी पाठवण्यासाठी पालिकेच्या व-हाळा पाणीशुध्दीकरण केंद्रात फोन उचलणारा कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांनी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.ही माहिती नगरसेवकांनी दिल्याने संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी अग्निशमन दलप्रमुख दत्ता साळवी यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना दिले. 

 

टॅग्स :thaneठाणेCorruptionभ्रष्टाचार