शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेचे उत्पन्नाचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:08 IST

शहरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरेंन्ट कंपनीने ग्राहकांना दिलेल्या पायाभूत सुविधांकरिता महापालिकेनी कंपनीकडे २८५ कोटी रुपयांची मागणी केली होती.

भिवंडी : शहरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरेंन्ट कंपनीने ग्राहकांना दिलेल्या पायाभूत सुविधांकरिता महापालिकेनी कंपनीकडे २८५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र शासनाने दिलेल्या फ्रेन्चायसी कंपन्यांकडून ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महापालिकेला कोणत्याही प्रकारची करआकारणी करता येणार नाही या निर्णयास राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने मागील आठवड्यात मान्यता दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नाच्या आशेवर पाणी फेरले आहे. अर्थात यामुळे ग्राहकांकरिता वीज स्वस्त होणार आहे.शासनाने सन २००७ पासून शहरात फ्रेन्चायसी दिलेल्या टोरेंन्ट वीज कंपनीकडे महापालिकने २८५ कोटी रूपयांची मागणी केली होती. शासनाच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांकडून राज्यात आवश्यक ठिकाणी विद्युत पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येते. या विद्युत पायाभूत सुविधांवर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका यांच्याकडून विविध कर आकारण्यात येतात. या करांचा बोजा सदर वीज कंपन्यांच्या एकुण वार्षिक महसुलाच्या गरजेमध्ये समाविष्ट असल्याने पर्यायाने त्याचा समावेश वीजदरात होतो. परिणामी वीजदरांत वाढ होते. सदर शासकीय कंपन्यांकडून राज्यातील जनतेस अखंडीत व सुरळीत वीजपुरवठा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याकरीता काम करावे लागते. त्यासाठी या कंपन्यांकडून ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका यांच्या हद्दीत वितरण रोहित्रे, विद्युतखांब, विद्युत मनोरे, पारेषण वाहिन्या, भूमिगत वाहिन्या व उपरी वाहिन्या उभारल्या जातात. त्यावर कोणत्याही कराची आकारणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून नये याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहेनिर्णयाचा फटकामहापालिकेने टोरेंन्ट कंपनीकडून अपेक्षित केलेली २८५ कोटींची कर आकारणी रद्द करावी लागणार आहे. या निर्णयाने पालिकेस फटका बसला आहे.महापालिकेनी ही कर आकारणी केली असती तर कंपनीने ती ग्राहकांकडून बिलात वसूल केली असती.

टॅग्स :thaneठाणे