शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेने छत्रपतींच्या पुतळ्यास सजावट न केल्याने शहरातील शिवप्रेमींकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:50 IST

भिवंडी  : शहरातील कोंबडपाडा मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जावेद दळवी व पालिकेच्या अधिकाºयांनी हार घालून शासकीय शिवजयंती साजरी केली.मात्र यावेळी पालिकेचे बहुसंख्य पालिकेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित नव्हते. या प्रसंगी पालिकेमार्फत छत्रपतींच्या पुतळ्यास सजावट न केल्याने शिवप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करीत पालिकेच्या कार्यपध्दतीचा तिव्र शब्दात निषेध ...

ठळक मुद्दे नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी केला तिव्र शब्दात निषेधमहाराजांच्या पुतळ्यास पालिकेने रंगरंगोटी व सजावट न केल्याने शिवप्रेमी संतप्तसकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे सुभाष माने यांनी पुतळ्याची सेवा करण्याची दिली ग्वाही

भिवंडी  : शहरातील कोंबडपाडा मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जावेद दळवी व पालिकेच्या अधिकाºयांनी हार घालून शासकीय शिवजयंती साजरी केली.मात्र यावेळी पालिकेचे बहुसंख्य पालिकेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित नव्हते. या प्रसंगी पालिकेमार्फत छत्रपतींच्या पुतळ्यास सजावट न केल्याने शिवप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त करीत पालिकेच्या कार्यपध्दतीचा तिव्र शब्दात निषेध केला.शासनाच्या परिपत्रकानुसार या वर्षी देखील पालिकेच्या वतीने पालिकेच्या सभागृहात महापौर जावेद दळवी यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत शिवजयंती साजरी केली.त्यानंतर कोंबडपाडा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर जावेद दळवी,उपमहापौर मनोज काटेकर, पालिका उपायुक्त विनोद शिंगटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शेट्टी तर सकल मराठा समाजाच्या वतीने सुभाष माने यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी शहरातील एकमेव शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालिकेने रंगरंगोटी व सजावट न केल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेचा निषेध केला.तर सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे सुभाष माने यांनी पालिकेस छत्रपतीच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्यास सजावट करण्यासाठी पैसे नसतील तर पालिकेने छत्रपतींचा पुतळा सकल मराठा समाजाकडे सोपविल्यास आम्ही पुतळ्याची सेवा करण्यासाठी तयार आहोत,असे सांगून निषेध केला.अजयनगर येथील मराठा भवन येथुन निघालेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना साईनाथ पवार,जयवंत सुर्यराव,अनिल फडतरे,अरूण राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी तिव्र शब्दात निषेध केला. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला नाही.तर काही कार्यालये आज उघडलीच नाही.अशा कार्यालयीन अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.शिवजयंती निमीत्ताने छत्रपतींच्या पुतळ्यास पालिके मार्फत सजावट न केल्याबाबत मनपा उपायुक्त विनोद शिंगटे यांना विचारले असता त्यांनी पुतळ्यास सजावट करण्याचे आदेश कर्मचाºयांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडीShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८