शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद आरपीआय इंदिसे गटाकडे; सभागृह नेतेपदी विकास निकम यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 17:15 IST

Bhiwandi Municipal Corporation : भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद व सभागृह नेतेपद कोणार्कने खेचून घेत सभागृहनेते पदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावली आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी  - भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी आरपीआय इंदिसे गटाचे नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लागली आहे. महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी मंगळवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाइन महासभेत निकम यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती केली आहे. गुरुवारी ते आपल्या सभागृह नेते पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौर पद व त्यानंतर आता अवघ्या चार नगरसेवक असलेले आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृहनेतेपद सोपविल्याने महापालिकेतील प्रस्थापित भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत सुरुवातीला काँग्रेसचे ४६ नगरसेवक निवडून आले होते मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याने शहरात काँग्रेसची वाताहात झाली आहे. तर भाजपकडे २० नगरसेवक असतानाही त्यांनी अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद व सभागृह नेतेपद कोणार्कने खेचून घेत सभागृहनेते पदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विकास निकम यांची वर्णी लावली आहे. 

नुकताच झालेल्या महासभेत भाजपचे शाम अग्रवाल यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढून घेतले होते. सभागृह नेतेपद हिसकावून घेतल्याने भाजप गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद देखील महापौरांनी काढून घेत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या मतलुब सरदार खान यांच्याकडे सोपविले होते. मात्र त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप आल्याने आयुक्तांनी मनपातील विरोधी पक्षनेत्यांचे दालन सील केले आहे. विशेष म्हणजे चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद तर चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृह नेतेपद सोपविल्याने आरपीआय इंदिसे गटात आनंद उत्साह व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे तर भाजप , शिवसेना व काँग्रेस मध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान महापौरांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभागृह नेते विकास निकम यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliticsराजकारण