शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 20:32 IST

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे.

नितिन पंडीत - भिवंडी -भिवंडी महापालिकेचा २०२२ - २३ या आर्थिक वर्षाचा ८४२ कोटी २९ लाख ४७ हजार रुपये रक्कमेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत स्थायी समितीचे सभापती संजय म्हात्रे यांनी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात मनपा आयुक्तांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले होते. मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने तब्बल २० कोटी रुपयांची वाढ केली आहे. 

यात महापौर निधी २ कोटी, उपमहापौर निधी ५० लाख रुपये, स्थायी समिती सभापती निधी ५० लाख, एक ते पाच समिती सभापतींना प्रत्येकी एक कोटी निधी, नगरसेवक निधी ८ कोटी ९५ लाख १६ हजार तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुनर्बांधणी व सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी, अशी २० कोटी रुपयांच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. 

या विशेष अर्थसंकल्पीय महासभेस मनपा आयुक्त सुधाकर देशमुख , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , सभागृह नेता सुमित पाटील, उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान, सचिव अनिल प्रधान, शहर अभियंता एल पी गायकवाड ,मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, जन संपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांच्यासह मनपा अधिकरी व नगरसेवक उपस्थित होते. 

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे. रस्ते व पदपाथ दुरुस्तीसाठी ९ कोटी, मनपा इमारती दुरुस्तीसाठी ५ कोटी ६८ लाख ९७ हजार, वार्षिक निविदा रोड मटेरिअल, चेंबर कव्हर साठी ३ कोटी ७५ लाख ८७ हजार, मनपा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट ३ कोटी, दिवाबत्ती दुरुस्ती व देखभालीसाठी २ कोटी, जंतूनाशक व इतर वस्तू खरेदीसाठी २ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १५ कोटी ,निवडणूक खर्चासाठी १० कोटी, मनपा इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ६० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर नविन रस्ते व फुटपाथ बांधण्यासाठी ५ कोटी ७४ लाख , तर नाले व गटार दुरुस्तीसाठी ३ कोटी ९० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBudgetअर्थसंकल्प 2022