शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीतील बाधीत परिवारांची खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भेट

By नितीन पंडित | Updated: June 29, 2024 19:36 IST

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार भिवंडीत घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- नितीन पंडित भिवंडी - भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार भिवंडीत घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या बाधीत परिवारांची भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शनिवारी भेट घेतली.यावेळी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले व माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या धोबी तलाव,रोशन बाग परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर ८ अशा नऊ घरांना महापालिका प्रशासनाने २२ मे २०२४ रोजी नोटीस बजावत रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतीचा मोबदला निश्चित करण्यासाठी महापालिकेकडे कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र अवघ्या एक महिन्यांच्या नोटीस कालावधीतच मनपाने मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर आठ नागरिकांची घरे भर पावसात तोडली आहेत.हि घरे तोडतांना मनपा प्रशासनाने येथील नागरिकांना कोणताही मोबदला दिला नाही व त्यांच्या राहण्याची कोणतीही सुविधा केली नसल्याने या कुटुंबियांना भर पावसात आपल्या परिवारासह बाहेर राहण्याची वेळ आली आहे.

या बाधीत नागरिकांची शनिवारी खासदार बाळ्या मामा त्यांनी भेट घेऊन रस्ता रुंदीकरण व शहर विकास होणे गरजेचे आहे मात्र भर पावसात नागरिकांच्या राहत्या घरांवर बुलडोझर चालवून व नागरिकांना बेघर करून त्यांना रस्त्यावर आणने चुकीचे आहे.या नागरिकांसाठी मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते,याविषयावर मनपा आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून सोमवारी यावर मार्ग काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी