शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी - कल्याण - शीळ रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:10 IST

कंत्राटदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी - कल्याण - शीळ या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी केला आहे. कंत्राटदारावर कारवाईची मागणी चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न केल्यास मनविसे आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. 

या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.  कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा रस्ता सहापदरी काँक्रीटचा बनविण्यात येत असून, लॉकडाऊनच्या काळातही काम सुरू होते. परंतु, या काळात तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार चौधरी यांनी केली आहे. साकेत इन्फ्रा कंपनी हे काम करत असून, कमी दर्जाचे सिमेंट वापरले जात आहे. ठिकठिकाणी रस्त्याला तडे जायला सुरुवात झालेली आहे.भिवंडीतील केवळ हाच नव्हे तर बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. या कामांमध्ये यंत्रणांमध्ये नियोजन नसल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक, प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

nभिवंडी बायपास येथे असलेल्या टाटा आमंत्रा  या निवासी संकुलासमोर कंत्राटदाराने चक्क मातीवरच रेडिमिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावेही त्यांनी महामंडळाला सादर केले आहेत. nरस्ता बनविताना सरकारी नियमांचे उल्लंघन कंत्राटदाराने केले असून, या संदर्भात आपण वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका