शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएकडे भिवंडी-कल्याण रोड उड्डाणपुलाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:42 IST

साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे.

मुंबई : भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. दोन पदरी मार्गिका असलेल्या या उड्डाणपुलाच्या ७८ सांध्यांपैकी ७७ साध्यांची कामे करण्यात आली आहेत.भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेंची लांबी ६ किमीची आहे. मात्र या पुलाचे काम करताना वाहतूक सुरू ठेवावी लागणार आहे.या पुलाची रुंदी कमी असल्याने एका मर्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवणे कठीण असल्याने २.३ किमी लांबीच्या मार्गाची योजना आखण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.हा उड्डाणपूल राजीव गांधी चौकातील विद्यमान पुलाला जोडला जाईल. काही समस्यांमुळे भिवंडी महानगरपालिकेकडून या जुन्या उड्डाणपुलाचे काही दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाच्या दुरुस्तीचे काम करण्यास थोडा वेळ लागत असल्याने साईबाबा मंदिर ते दांडेकर कंपनीजवळ रॅम्पजवळील भागाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.कल्याण ते भिवंडी दिशेने जाणाऱ्या एका मार्गाची वाहतूक १६ नोव्हेंबरपासून उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाचे डांबरीकरणाचे काम होऊ शकणार आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए