शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना ; तब्बल 13 दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 16:38 IST

आजही ही घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचलेल्या मात्र परिवार गमावलेल्या माणसांचे अश्रू आजही अनावरच होत आहेत.

नितीन पंडितभिवंडी - शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाऊंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना २१ सप्टेंबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा बळी गेला असून, २५ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक जण आपल्या परिवारातील सदस्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. या दुर्दैवी घटनेत कुणाची आई कुणाचे बाबा, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाचा मुलगा, कुणाची लेक तर कुणाचं भविष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. आजही ही घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचलेल्या मात्र परिवार गमावलेल्या माणसांचे अश्रू आजही अनावरच होत आहेत.शब्बीर कुरेशी हा या दुघटनेत वाचलेला मात्र परिवार उद्ध्वस्त झालेला एक इसम आहे. या दुर्घटनेत शब्बीर कुरेशी यांनी आपल्या पत्नीसह दोन लहानगी मुले गमावली आहेत. शब्बीर कुरेशी यांची २८ वर्षीय पत्नी परवीन कुरेशी यांच्या सह चार वर्षांची मुलगी मरियम व अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ असे तीन जण या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत, तर त्यांची दोन मुले आठ वर्षांचा सादिक व सहा वर्षांचा शाहिद ही दोन मुले या दुर्घटनेत वाचली आहेत. मात्र त्यांचा अडीच वर्षांचा मुसेफ हा या दुर्घटनेनंतर आजही बेपत्ता आहे.बेपत्ता मुसेफच्या शोधासाठी शब्बीर रोज दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेत आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्याची येथील शोधमोहीम चार दिवसांनंतर थांबली आहे. मात्र तब्बल १३ दिवस शब्बीर एकटेच या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला घुटमळतांना दिसत आहेत. शब्बीर रोज इथे येतो ढिगाऱ्यातील दगड विटा व इतर मलबा बाजूला करतो व त्याखाली आपल्या अडीच वर्षांच्या मुसेफचा शोध घेतो. मात्र तो मिळत नसल्याने हताश व निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततो. शब्बीरचा हा दिनक्रम तब्बल १३ दिवसांपासून अविरत सुरूच आहे.शब्बीर आज (शनिवारी) दुर्घटनेच्या तब्बल १३ दिवसांनी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली घुटमळतांना दिसला. शब्बीर हा दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पाहिल्या माळ्यावर राहत होता. इमारत कोसळली त्याआधी शब्बीरने आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना झोपेतून उठवले होते व त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. मात्र आपल्या परिवारातील त्यांची पत्नी व दोन मुलांना ते वाचवू शकले नाहीत. विशेष म्हणजे शब्बीर यांच्या पत्नीसह मुलीचा मृतदेह बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून काढला होता मात्र त्यांचा अडीच वर्षांच्या मुसिफ चा शोध आजही शब्बीर यांना लागला नसल्याने ते रोजच या इमारतीच्या ढंगाऱ्याच्या आजूबाजूला घुटमळतांना दिसतात. शनिवारी देखील १३ दिवसांनंतरही ते या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ दिसले. प्रशासनाने शोध मोहीम थांबवली मात्र अडीच वर्षांच्या चिमुरड्या मुसिफच्या शोधात शब्बीर रोज या ढिगाऱ्याजवळ जाऊन मुलाच्या आठवणीने बेचैन होत आहे. दुर्घटनेत पत्नी व मुले गमावलेल्या शब्बीर प्रचंड तणावात आहे. मात्र प्रशासन शाब्बीरच्या या अशा परिस्थितीची दखल घेणार का हाच एक प्रश्न आहे.दरम्यान मी रोज येथे येतो मुलाचा शोध घेतो मात्र तो मिळत नसल्याने पुन्हा माघारी घरी जातो मुलाची आणि परिवाराची आठवण मला अस्वस्थ करते माझा मुलगा मला मिळाला नाही त्यामुळे मी माझ्या चिमुरड्याची कायम वाट पाहत राहीन अशी भावनिक प्रतिक्रिया शब्बीर कुरेशी यांनी दिली आहे .