शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली भर पावसात तोडली नागरिकांची घरे, भिवंडी मनपाचा अजब कारभार

By नितीन पंडित | Updated: June 28, 2024 18:40 IST

Bhiwandi News: उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- नितीन पंडित भिवंडी - उन्हाळ्याच्या दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असलेल्या भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र घरे तोडण्याआधी मनपा प्रशासनाने या नागरिकांसाठी कोणत्याही प्रकाराची निवाऱ्याची व्यवस्था केली नसल्याने येथील नागरिक मनपा प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या धोबी तलाव,रोशन बाग परिसरात रस्ता रुंदीकरणाचे हाती घेणार असल्याने या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर ८ अशा नऊ घरांना महापालिका प्रशासनाने २२ मे २०२४ रोजी नोटीस बजावत रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतीचा मोबदला निश्चित करण्यासाठी महापालिकेकडे कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र अवघ्या एक महिन्यांच्या नोटीस कालावधीतच मनपाने मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर आठ नागरिकांची घरे भर पावसात तोडली आहेत.

या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे कोणतेही काम सध्या सुरू नसतांना मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या बाधित क्षेत्रात पेक्षा अधिक क्षेत्रात मनपाने बुलडोझर लावत हि सर्व घरे तोडून टाकल्याने गरीब कुटुंब रस्त्यावर आली आहेत.शुक्रवारी भर पावसात दसऱ्या घराच्या आडोशाला ताडपत्री बांधून हे कुटुंबीय रहात आहेत.भर पावसात अशा प्रकारे नागरिकांच्या निवाऱ्याची सोया न करता व घरांचा मोबदला न देता मनपा प्रशासनाने आमची घरे का तोडली असं सवाल येथील बाधीत कुटुंब विचारात आहेत. मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक आमची घरे तोडून आम्हाला बेघर केले आहे,ना मोबदला दिला ना राहण्याची व्यवस्था केली आता आम्ही परिवारासह राहणार कुठे असा सवाल या बाधीत कुटुंबातील महिला विचारत आहेत.

रस्ता रुंदीकरणासाठी येथील घरे बाधित झाली होती,येथील नागरिकांना मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या होत्या, मात्र ही घरे मनपाच्या जागेत असल्याने कोणताही मोबदला न देता तोडण्यात आली आहेत. अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा प्रभाग समिती चारचे प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे