शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला; यंत्रमाग व्यवसाय राहणार वीस दिवस बंद 

By नितीन पंडित | Updated: October 31, 2023 18:34 IST

Bhiwandi News: यार्नमधील सट्टेबाजारी,वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार व व्यवसायातील प्रचंड मंदी यामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यावसायिकांनी तयार केलेल्या कापडाची विक्री होत नसल्याने लाखो मीटर कापड बनवून कारखान्यांमध्ये पडलेला आहे.

- नितीन पंडितभिवंडी - कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे. यार्नमधील सट्टेबाजारी,वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार व व्यवसायातील प्रचंड मंदी यामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यावसायिकांनी तयार केलेल्या कापडाची विक्री होत नसल्याने लाखो मीटर कापड बनवून कारखान्यांमध्ये पडलेला आहे. यंत्रमाग व्यवसायातील मंदीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी एकता गृप या यंत्रमाग युनियनच्या वतीने बुधवारी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पासून २० दिवसांचा बंद पुकारला आहे.

विजेची दरवाढ व व्यवसायातील मंदी यामुळे शहरातील छोटे यंत्रमाग व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.मात्र दुसरीकडे यंत्रमाग व्यावसायातील बड्या व्यापाऱ्यांनी या व्यवसायात आपले बस्तान मजबूत केल्याने बड्या व्यापाऱ्यांचे कारखाने शहरात दिवस रात्र सुरु आहेत. या बड्या व्यावसायिकांचा कापड देशातील विविध राज्यांबरोबरच परदेशातही जात असल्याने या बड्या व्यावसायिकांना मंदीचा फटका सहजासहजी बसत नाही मात्र शासकीय धोरण व सततची वीज दरवाढीमुळे छोट्या व्यवसायिकांना मंदीचा त्रास सहन करावा लागत आहे.

कापड व्यवसायाच्या मंदीमुळे छोटे व्यापारी एकत्र येऊन त्यांनी एक नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा वीस दिवसांसाठी यंत्रमाग कारखाने ऐन दिवाळी सणात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या बंदमुळे यंत्रमाग व्यवसायात आलेली मंदी कमी होण्याची शक्यता या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बड्या व्यापाऱ्यांनी दिवाळी काळातील कापड मालाचे व्यवहार केले असल्याने त्यांना  कंपन्यांना कापड पुरविणे गरजेचे होणार असल्याने बड्या व्यापाऱ्यांनी या आंदोलना वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या यंत्रमाग आंदोलनात देखील दोन गट पडले असल्याचे बोलले जात आहेत. मात्र यंत्रमाग व्यापाऱ्यांनी बंद बाबत पुकारलेल्या मागण्या रास्त असल्याचेही या बड्या व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. यंत्रमाग व्यावसायिकांनी पुकारलेल्या या बंद मुळे शहरातील लाखो यंत्रमाग कामगारांवर देखील एन सणात परिणाम होणार आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी