शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi Gram panchayat Elections: भिवंडीतील १३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By नितीन पंडित | Updated: December 18, 2022 18:30 IST

१४४ पैकी १२ सदस्य बिनविरोध, उर्वरित १३२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी मतदान

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या मतदानाला रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली.भिवंडी तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाली होती.त्यापैकी एकनाथ शिंदे गटातील आमदार शांताराम मोरे यांच्या खानिवली या गावातील सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित १३ ग्रामपंचायतीसाठी १३ थेट सरपंच तर १४४ पैकी १२ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १३२ ग्रामपंचायती सदस्य निवडी करता मतदान झाले.

कारीवली, कोनगाव, कशेळी, कोपर, कांबे या ग्रामपंचायती मधील निवडणूका प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या होत असून भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ अशा लढती होत आहेत. सकाळी साडेसात ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६९.८७ टक्के मतदान पार पडले होते.

भिवंडीतील कोन गावात भाजपा विरोधात शिंदे गटात चुरस

भिवंडी कल्याण रस्त्याच्या सीमेवरील कोनगाव ही झपाट्याने शहरीकरण होत असलेली ग्रामपंचायत चर्चेत असून या ठिकाणी तब्बल १७ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे असल्याने मोठी चुरस दिसून येत आहे .विशेष म्हणजे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असलेली ग्रामपंचायत ओळखली जात असताना त्यांचे कट्टर विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपा बंडखोर उमेदवार डॉ रुपाली कराळे यांच्या सोबत हातमिळवणी करून या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला कडवे आव्हान दिले आहे.या दोघांमध्ये या निवडणुकीत बाजी कोण मारतं ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकBhiwandiभिवंडी