शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:30 IST

भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला.

- नारायण जाधवठाणे  - भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. भूसंपादनाअभावी तो रखडलेला असतानाच आता खर्च वाचविण्यासाठी त्याची रुंदीच तब्बल १५ मीटरने कमी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे हा रस्ता ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचाच बांधण्यात येणार असून शिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून बांधण्यात येणारा सेवा रस्ताही त्यातून वगळला आहे. यामुळे या रस्त्याचा खर्च ४५० कोटी ६० लाखावरून थेट १६० कोटी ९८ लाखांवर आला आहे. यामुळे एमएमआरडीएच्या तब्बल २८९ कोटी ६२ लाख रुपयांची बचत होणार आहे.सध्या भिवंडीहून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमार्गे जावे लागते. यात वेळ, श्रम, पैसा तर खर्च होतोच शिवाय वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. आपत्कालिन परिस्थितीत तर अनेक अडचणी येतात. यामुळे भिवंडीहून माणकोली-मोठागाव दरम्यान खाडीत पूल बांधून थेट डोंबिवलीला जाण्यासाठी हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर म्हणजे सीआरझेडसह पर्यावरण खात्याची मंजुरी, भूसंपादनाचा होता. यासाठी मोठ्याप्रमाणात पैसा लागणार आहे. यामुळे खर्चात बचत करण्यासाठी एमएमआरडीएने सेवा रस्ता वगळण्यासह त्याची रुंदी कमी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.हा पूल झाल्यानंतर डोंबिवलीहून थेट मुंबई-नाशिक महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे डोंबिवलीहून भिवंडीसह ठाणे, मुंबईसह वसई-विरार आणि नाशिक या महानगरांतील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. यात मोठ्याप्रमाणात इंधन बचत होईल. शिवाय कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.भिवंडीतील गोदामपट्टा हा मानकोली, काल्हेर परिसरात असल्याने डोंबिवली एमआयडीसी थेट या भागात जोडली जाऊन तेथील उद्योजकांच्या मालवाहतुकीवरील खर्चात बचत होणार आहे.भूसंपादनासाठी मोजणार सुमारे ७३ कोटी रूपयेमाणकोली ते उल्हासखाडीवरील ३० मीटर रुंद आणि ३.३० किमी लांबीचा पूल ४१ कोटीमुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली येथील इंटरचेंजची कामे (उजवे वळण वगळून) २० कोटीएक भूयारी मार्ग बांधण्यासाठीचा खर्च १५ कोटीसल्लागार शुल्क १.३८ कोटीआकस्मिक खर्च ३.४५ कोटीसेवा वाहिन्या स्थलांतरीत करणे ६.९० कोटीभूसंपादन खर्च ७३.२५ कोटीएकूण १६०.९८ कोटीनव्या निर्णयानुसार असा वाचेल खर्चतीनऐवजी एकच भूयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.४५ ऐवजी ३० मीटर रुंदीचे भूसंपादन करून तेवढाच रस्ता बांधण्यात येईलदोन्ही बाजूच्या साडेसात मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम वगळण्यात आले आहे.माणकोली जंक्शनजवळील उजव्या वळण्यासाठी केलेली इंटरचेंजची तरतूद पूर्णपणे वगळली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीbhiwandiभिवंडी