शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी कोर्टाची महानगरपालिकेवर जप्तीची कारवाई, कोर्टाच्या आदेशानुसार मनपाचे कार्यालयीन सामान जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:19 IST

पंचवीस वर्षापुर्वी रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात पालिकेकडून पर्यायी जागा न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने आज महानगरपालिकेवर जप्तीची पाळी आली.

भिवंडी दि.३० : पंचवीस वर्षापुर्वी रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात पालिकेकडून पर्यायी जागा न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने आज महानगरपालिकेवर जप्तीची पाळी आली.कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कोर्टाच्या बेलीफने आयुक्त कार्यालयांतील खुर्चा,सोफा व संगणक जप्त केले आहे.शहरातील कासारआळी घर क्र.१,वाडा स्टॅण्ड येथे रामभाऊ रावण घाडगे यांचे किराणा दुकान होते.हे दुकान सन १९९२ साली पालिकेने रस्ता रूंदीकरणासाठी तोडले.त्याबदली पालिका प्रशासनाने घाडगे यांना एस.टी.स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ ८ बाय १०फुटाची जागा दिली .ही जागा घाडगे यांनी स्वत: बांधल्यानंतर सन २००३साली ती पालिका प्रशासनाने तोडली.त्यामुळे त्यांनी रस्ता रूंदीकरणात गेलेल्या जागेबदली पर्यायी जागा मिळण्यासाठी पालिका प्रशासनास विनंती अर्ज केले.परंतू तत्कालीन मुख्याधिकारी,आयुक्त व विकास अधिकाºयांनी त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने रामभाऊ घाडगे यांनी भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.मात्र या दाव्याकडे पालिकेच्या विधी अधिकाºयांनी,नियुक्त वकील पॅनेलने दिरंगाई करीत दुर्लक्ष केल्याने भिवंडी कोर्टाने पालिकेतील फर्नीचर,पंखे व संगणक आदि वस्तू जप्त करण्याची आदेश दिले .या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता पालिकेत रघुनाथ पगारे व जे.एम.भामरे हे दोन बेलीफ आपल्या कर्मचा-यांसह आले होते.त्यांनी आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेऊन कोर्टाचे आदेश बजावले.त्यानुसार बेलीफ आणि कर्मचा-यांनी आयुक्त कार्यालयांतील दोन सोफे,खुर्च्या व संगणक जप्त करून कोर्टात नेले. या घटनेप्रकरणी आयुक्तांशी भेट घेतली असता त्यांनी ‘सदरची बाब ही सन १९९२सालातील आहे.या बाबत संबधितांनी माहिती दिलेली नाही.या संदर्भात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’असे सांगितलेकाही दिवसांपुर्वी काढलेल्या जाहीर निवेदनाद्वारे आयुक्त योगेश म्हसे यांनी नवीन १६ वकीलांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या दरम्यान पालिकेवर झालेली ही जप्तीची कारवाई शहराच्या दृष्टीने भूषणावह नाही,अशा प्रतिक्रीया शहरातून उमटल्या.त्याचप्रमाणे ही जप्तीची कारवाई होई पर्यंत पालिकेचे वकील काय करीत होते? असा प्रश्न शहरवासीयांतून विचारला जात आहे.तसेच पालिकेतील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी किती जबाबदारीने कामे करीत आहेत, हे कोर्टाच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :thaneठाणे