शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:36 IST

दुसऱ्यांदा घडली घटना : वाहतूक बंद ठेवल्याने झाली कोंडी

भिवंडी : कल्याण नाका येथील उड्डाणपुलाचा भाग मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही काळ कोंडी झाली होती.भिवंडी - कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या साडेतीन किलोमीटर लांबीच्या साईबाबा ते कल्याण नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १८४ कोटी खर्च येणार आहे. या कंपनीच्या बांधकामाचे कंत्राट जेएमसी या कंपनीला दिले आहे.

मात्र कंत्राटदार कंपनीच्या भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागीलवर्षीही उड्डाणपुलाच्या खांबाला तडा जाऊन स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे खांबाला जॅक लाऊन काही महिने टांगून ठेवले होते. त्यातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलाच्या खांबावरील दोन रॅम्पला जोडण्याचे काम सुरू असताना या पुलाचा काही भाग कोसळला. या पुलाचा भाग कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने वारंवार होणाºया या दुर्घटनांमुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.दरम्यान, या पुलाच्या निकृष्ट कामाबाबत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने एमएमआरडीए व पालिका आयुक्तांकडे अनेकवेळा लेखी तक्र ारी केलेल्या आहेत.अहवाल देण्यास टाळाटाळमागीलवर्षी जेव्हा उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता त्यावेळी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेची चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकारच्या वतीने यासंदर्भातील अहवाल तयार करून या उड्डाणपुलाचे काम आठ महिने थांबविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा अहवाल एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याची खंत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेRainपाऊस