शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi Building Collapse: घरमालकांचा हव्यास महागात पडला अन् भिवंडीत अनर्थ घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 20:00 IST

पैशांच्या हव्यासापोटी घरमालकांनी घरं भाड्यानं दिली; कामगार पोहोचले मृत्यूच्या दाढेत

- नितिन पंडीत भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच दुसरी इमारत असल्याने सुरुवातील बचाव कार्यात अडचणी आल्या. विशेष म्हणजे सुमारे 37 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला मनपा प्रशासनाने धोकादायक ठरवले होते. नोटीस देऊन जसे मनपा प्रशासनाने आपले हात झटकले त्याच पद्धतीने इमारत मालकाने सुरुवातीला सदनिका विकून आपले हात झटकले होते. नंतर इमारत धोकादायक ठरल्यानांतर सदनिका मालकांनी आपापल्या सदनिका रिकाम्या केल्या. मात्र त्या पुन्हा भाड्याने दिल्या होत्या. कमी भाड्याच्या लालसेपोटी शहरातील कामगारांनी या इमारतीत भाड्याने आपला संसार थाटला होता. मात्र भाड्याच्या लालसेने व पैशांच्या हव्यासाने इमारत मालकासह सदनिका मालकांनी गरीब भाडोत्री कुटुंबियांच्या जीवाची कोणतीही पर्वा केली नाही हे दुर्दैव. भिवंडीत तीन मजली धोकादायक इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूचकमी घरभाडे असल्याने गरीब मजूर आपल्या कुटुंबांसह घरांमध्ये राहायला आले. मध्यरात्रीच्या सुमारास इमारत कोसळली आणि मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून या दहा मृत व्यक्तींमध्ये दोन वर्षांपासून ते 14 वर्षांपर्यंत सात चिमुरड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निष्पाप जीवांना न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतसर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडीत अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. ज्या ज्या वेळेस भिवंडीत एखादी इमारत दुर्घटना घडते त्या त्या वेळेस क्लस्टर योजना राबविण्याचा मुद्दा पुढे येतो मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळेच आजही शहरात अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपा प्रशासन फक्त नोटीस बजावून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असते. मात्र धोकादायक ठरवल्यानंतर घरांमध्ये राहणाऱ्यांची काय याचा विचार होत नसल्याने हजारो नागरिक आजही अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होणार का असा सवाल सामान्य नागरिक विचारात आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी