शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

Bhiwandi Building Collapse: मुलाच्या शोधासाठी बापाची वणवण; रोज ढिगाऱ्याजवळ येतो; शोध घेतो अन् अश्रू ढाळत घरी परततो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 01:07 IST

Bhiwandi building collapse: अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ आपल्याला सापडेल, अशी शब्बीरची भाबडी आशा आहे.

- नितीन पंडित भिवंडी : धामणकरनाका परिसरात असलेल्या पटेल कम्पाउंड येथील जिलानी इमारत २१ सप्टेंबर रोजी कोसळली. यात ३८ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले. तर, अनेक जण आपल्या परिवारातील सदस्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. दुर्घटनेत कुणाची आई, वडील, भाऊ, बहीण तर कुणाचा मुलगा गेला.आजही ही घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचला, मात्र परिवार गमावलेल्या माणसांचे अश्रू वाहण्याचे थांबत नाही. या घटनेला १३ दिवस उलटून गेले, मात्र शब्बीर कुरेशी हा बाप आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी रोज ढिगाºयाजवळ येतो. अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ आपल्याला सापडेल, अशी शब्बीरची भाबडी आशा आहे.शब्बीर हा या दुर्घटनेत वाचलेला, मात्र परिवार उद्ध्वस्त झालेली एक व्यक्ती आहे. या दुर्घटनेत शब्बीर यांनी पत्नीसह दोन लहान मुले कायमची गमावली आहेत. शब्बीर यांची २८ वर्षीय पत्नी परवीन यांच्यासह चार वर्षांची मुलगी मरियम व अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ असे तीन जण या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत.तर, त्यांची दोन मुले आठ वर्षांचा सादिक व सहा वर्षांचा शाहीदही वाचले आहेत. मात्र, त्यांचा अडीच वर्षांचा मुसेफ हा आजही बेपत्ता आहे. बेपत्ता मुसेफच्या शोधासाठी शब्बीर रोज इमारतीच्या ढिगाºयाजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेतो. दुर्घटनेनंतर चार दिवसांनी बचावकार्यही थांबले. मात्र, शब्बीरचा शोध मात्र थांबलेला नाही. केविलवाण्या चेहºयाने तो नित्यनेमाने शोधकार्य करत आहे.१३ दिवस शब्बीर एकटाच ढिगाºयाच्या आजूबाजूला घुटमळताना दिसतो. शब्बीर ढिगाºयातील दगड, विटा व इतर मलबा बाजूला करतो व त्याखाली मुसेफचा शोध घेतो. मात्र, तो मिळत नसल्याने हताश व निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततो. मात्र दुसºया दिवशी पुन्हा ढिगाºयापाशी जाऊ न आपला मुलगा सापडतो का ते पाहतो.‘कुटुंबाची आठवण अस्वस्थ करते’भिवंडी : शब्बीर हा दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. इमारत कोसळली त्याआधी शब्बीरने आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना झोपेतून उठवले होते व त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्नी व दोन मुलांना तो वाचवू शकला नाही. शब्बीरची पत्नी व मुलीचा मृतदेह बचाव पथकाने ढिगाºयाखालून काढला, मात्र अडीच वर्षांच्या मुसिफचा शोध आजही शब्बीर याला लागला नसल्याने रोज ढिगाºयाजवळ येतो.मुसिफच्या आठवणीने तो बेचैन होतो. शब्बीर सध्या प्रचंड तणावाखाली आहे. मात्र, प्रशासन शब्बीरच्या परिस्थितीची दखल घेणार का, हा खरा प्रश्न आहे.दरम्यान, मी रोज येथे येतो, मुलाचा शोध घेतो. मात्र, तो मिळत नसल्याने पुन्हा माघारी घरी जातो. मुलाची आणि परिवाराची आठवण मला अस्वस्थ करते.माझा मुलगा मला मिळाला नाही, त्यामुळे मी माझ्या चिमुरड्याची कायम वाट पाहत राहीन, अशी भावनिक प्रतिक्रिया शब्बीर कुरेशी याने दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी