शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

भिवंडी इमारत दुर्घटना: आरोपीला होणार कोणत्याही क्षणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:54 IST

भिवंडीतील इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला. दोन महिन्यांपूर्वी जिलानी इमारतीच्या पश्चिमेकडील भाग कोसळून ३८ जणांचा बळी गेला होता.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचे आदेश आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीतील इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीचा अटकपूर्व जामीन ठाणेन्यायालयाने बुधवारी फेटाळला. दोन महिन्यांपूर्वी जिलानी इमारतीच्या पश्चिमेकडील भाग कोसळून ३८ जणांचा बळी गेला होता. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पटेल कंपाऊंडमधील ही इमारत २१ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली होती. याप्रकरणी इमारत मालकाविरु द्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी महापालिका प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. त्याचबरोबर दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. ग्रामपंचायत काळात परवानगी न घेताच ही इमारत उभारली होती. इमारतदुरु स्त करून सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक आणि भोगवटादार यांनी पार पाडली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही इमारतीची धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये वर्गीकरण केले नसल्याचे काही निष्कर्ष समितीने काढले होते. नारपोली पोलिसांकडून इमारत मालकाचा शोध घेण्यात येत होता. दुसरीकडे मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.फडोले याने मुळ मालकाकडून रजिस्टर पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी घेऊन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन मजल्याचे बांधकाम केले. त्यापैकी इमारतीमधील २६ घरेही त्यानेच विक्री केली. इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. जामीन मिळविणे हा आरोपीचा अधिकार आहे. परंतू तो मंजूर करतांना आरोपींना बेकायदेशीर कृत्य करण्याचा परवाना दिलेला नाही. समाजाची सुरक्षितता ही महत्वाची आहे. समाज सुरक्षित राहिला पाहिजे या बाबी जामीन मंजूर करताना पाहणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केल्याचे सरकारी वकील संजय मोरे यांनी सांगितले. तसेच आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग,त्याची भूमिका, आरोपीकडे करावयाची चौकशी तसेच गुन्ह्याची गांभीर्यता या सर्व गोष्टींचा विचार करून फडोल याचा न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयBuilding Collapseइमारत दुर्घटना