शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 18:45 IST

भिवंडी शहरातील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफचे जवान अशा तब्बल 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

नितीन पंडित 

भिवंडी- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण व मृत्यू झाल्याच्या घटना देशासह राज्यात घडल्या आहेत. दरम्यान भिवंडी शहरातील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफचे जवान अशा तब्बल 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात 31 पोलीस अधिकारी तर 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढतच गेला. सध्या शहरात 3671 तर ग्रामीण भागात 3126 असे एकूण 6797 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस यंत्रणेवर देखील ताण वाढला होता त्यातच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या परिमंडळ दोन मधील सहाही पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफ जावं अशा एकूण 131 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती . विशेष म्हणजे यातील 114 पोलीस कर्मचारी बरे झाले असून त्यातील 77 पोलीस पुन्हा कर्तव्यावर हजार झाले आहेत. तर 17 पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस