शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भार्इंदर पालिका : वरिष्ठांचीही आता हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:48 IST

महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पालिकेने ५० कार्यालयांमध्ये ५६ यंत्रे बसवली आहेत. तर, शाळांमध्येही ही यंत्रे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे.

मीरा रोड  - महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पालिकेने ५० कार्यालयांमध्ये ५६ यंत्रे बसवली आहेत. तर, शाळांमध्येही ही यंत्रे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे.नगरपालिकेपासून तसेच महापालिका झाल्यानंतरही अधिकारी, कर्मचाºयांच्या हजेरीचा मोठा घोळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. कामावर यायचे नाही आणि नंतर येऊन हजेरी लावायची किंवा हजेरी लावून निघून जायचे आदी प्रकार सर्रास चालतात. नोंदवहीमध्ये हजेरी नोंदवण्याचे प्रकार तर आजही पालिकेच्या अनेक विभागांत चालले आहेत.काही वर्षांआधी मुख्यालयात बायोमेट्रिक थम्ब इम्पे्रशनच्या आधारे हजेरी सुरू केली असता अनेक कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांचा छुपा विरोध सुरू झाला. अगदी मशीनमध्ये पाणी ओतण्यापासून अनेक खटाटोप केले गेले. पुढे बायोमेट्रिकच्या आधारे हजेरीनुसार पगार काढण्याचे अनेक आदेश निघाले. पण, त्याचे काटेकोर पालन झालेच नाही.पालिकेच्या रुग्णालयातही सकाळी हजेरी लावून जाणारे कामावरून निघताना मात्र हजेरी लावत नसल्याचे उघड झाले. तर, आरोग्य केंद्र व शाळांमध्येही गैरहजर असताना नंतर येऊन हजेरी लावण्याच्या घटनासुद्धा समोर आल्या. त्यातही वर्ग १ च्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदींना हजेरीच्या कक्षेत आणले जात नव्हते. शिवाय, वर्ग २ चे काही अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंते यांनीदेखील कारणे पुढे करून आपली हजेरीतून सुटका करून घेतली होती.हजेरीचा घोळ व कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांवर आळा घालण्यासाठी अखेर आधारवर आधारित बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी घेतला होता.आस्थापनेवर स्थायी व अस्थायी स्वरूपात काम करणाºया १७२५ अधिकारी व कर्मचाºयांनी नोंदणी करत आधारकार्डवर आधारित बायोमेट्रिक थम्ब इम्पे्रशन मशीनवर हजेरी सक्तीची करण्यात आली. जानेवारी महिन्यात या मशीन आणल्यानंतर फेब्रुवारीपासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, त्यामध्ये वर्ग-१ चा एकही अधिकारी हजेरी लावत नव्हता. शिवाय, वर्ग २ चे काही अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंतादेखील या हजेरी यंत्राचा वापर करत नव्हते.आता १ एप्रिलपासून वर्ग १ पासून वर्ग ४ च्या सर्व अधिकारी तसेच कर्मचाºयांना यंत्राद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. महापौर डिम्पल मेहता यांनीही बड्या अधिकाºयांना हजेरी बंधनकारक करण्याची मागणी केली होती.मुुख्यालय, रुग्णालय, प्रभाग कार्यालय, नगररचना, वसुली कार्यालय, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्र, बालवाड्या आदी सुमारे ५० ठिकाणी पालिकेने ५६ हजेरी यंत्रे बसवली आहेत. आपला आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याला बोटांच्या ठशांनी हजेरी लावायची आहे. जाताना पण तीच पद्धत अनुसरायची आहे. पालिकेच्या हजेरीसाठीच्या संकेतस्थळावरही याची माहिती अपडेट होत राहील.रजेचा अर्जही आॅनलाइन भरता येणाररजेचा अर्ज पण आॅनलाइन भरता येणार असून तो मंजूर झाल्याचेही कळेल. आस्थापना विभागाकडे मास्टर लॉग इन असल्याने त्यांना पगार काढताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा हजेरीडाटा वेळेसह कळणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक