शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

भार्इंदर पालिकेने दमदाटीने तोडली जुनी बांधकामे

By admin | Updated: June 21, 2016 01:19 IST

भार्इंदर पुर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीरा भार्इंदर महापालिकेने मोबदला न देताच जुनी बांधकामे दमदाटी आणि दडपशाहीने तोडल्याचे समोर आले आहे.

मीरा रोड : भार्इंदर पुर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीरा भार्इंदर महापालिकेने मोबदला न देताच जुनी बांधकामे दमदाटी आणि दडपशाहीने तोडल्याचे समोर आले आहे. यांमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून पालिकेच्या झुंडशाही विरुध्द संताप व्यक्त करताना लोकांना अश्रू अनावर झाले. दुसरीकडे, भाजपा आमदाराची सदनिका आणि दुकान असणाऱ्या अनधिकृत शीतल निकेतनसह श्याम भवन इमारतीला मात्र हातही लावला नसल्याने प्रशासन भाजपा आमदाराच्या सोयीनुसार बांधकामे तोडत असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. दरम्यान, ही तोड कारवाई सलग रेषेत नसल्याने रुंदीकरण कोणाच्या सोयीसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर ग्रामपंचायतीपासून निवासी इमारती, दुकाने तसेच औद्योगिक गाळे आहेत. पालिकेने ही बांधकामे चक्क अनधिकृत ठरवत बाऊन्सर आणि पोलीस बंदोबस्तात दमदाटी व दडपशाही करुन तोडण्याचा सपाटा लावला आहे. येथे फेरफटका मारला असता पालिकेने केलेल्या अत्याचाराचे पाढे मांडता मांडता लोकांना हुंदके आवरेनासे झाले. १९६५ पासूनची दळवी इस्टेट मधील दुकाने कोणतीही नोटीस न देताच तोडण्यात आली. लोकांना जराही वेळ दिला नाही असे येथील नुकसानग्रस्त लोकांनी सांगितले. येथील जी.एम.पाटील इस्टेट तळ अधिक १ मजली दर्शनी भागात १२ दुकाने होती. २००२ मध्ये रुंदीकरण केले तेव्हा दुकानांचा दर्शनी भाग तोडला होता. त्याचा मोबदला अद्यापही लोकांना मिळाला नाही. घीसुलाल रोटागण यांचे इलेक्ट्रीकल वस्तुंचे दुकान ३५ वर्षांपासुन होते. १३१ फुटाचे दुकान आता ४० फुट राहिल्याचे ते म्हणाले. प्रकाश लोढा यांचे पदम आॅर्नामेंट हे दुकान देखील १५० फुटा ऐवजी आता जेमतेम ७० फुट उरले आहे. १९७० पासुन असलेले चप्पलचे दुकान तर पुर्णच गेले असुन मोबदला नाही व रोजगार पण नसल्याने उपासमारीची पाळी आल्याचे देवाडिगा यांनी सांगितले.मातृछाया या तळ अधिक १ मजली इमारतीला धोकादायक ठरवुन पाडण्यात आले. साई जागृतीच्या बाजूला सेनेचे विभागप्रमुख दत्ता माळी यांचे दत्त निवास हे एकमजली बांधकाम आहे. २००२ मध्ये काही भाग तोडला. आता देखील पालिका अधिकारी सरळ जेसीबी घेऊन आले व तुम्ही तोडा नाही तर आम्ही जेसीबी लावतो असा दमच दिला. सामानाचे नुकसान होऊ नये म्हणुन दुकानाचा आणखी काही भाग तोडला असे माळी म्हणाले. (प्रतिनिधी)१०० टक्के बाधितांचे पुनर्वसन महिनाभरातभार्इंदर : पालिकेच्या शहर विकास आरखड्यानुसार पालिकेने सुरु केलेल्या तोड कारवाईवरुन तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी वास्तविक जी बांधकामे रस्ता रुंदीकरणात १०० टक्के बाधित झाली आहेत, त्यांना येत्या ३० दिवसांत पर्यायी जागा देऊन त्यातील लोकांचे पुनर्वसन पालिकेमार्फत केले जाईल, अशी माहिती आ. नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.शहर विकास आराखड्याला मंजुरी मिळुन १९ वर्षे पुर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने त्यातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम व अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण गुलदस्त्यात ठेवले होते. अखेर त्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याची जाग प्रशासनाला आली. यामुळे जनतेत प्रक्षोभ उसळल्याने बाधितांच्या पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील १०० टक्के बाधितांसह ५० टक्के बाधितांचे त्यांच्या नुकसान भरपाईपोटी अतिरीक्त चटईक्षेत्र अथवा टिडीआर देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कारवाईत संपुर्ण शहरातील सुमारे १२ इमारती पुर्णपणे बाधित होत असल्याने त्यांच्या पुनर्विकासाकरीता पालिकेकडून परवानगी तसेच त्यातील रहिवाशांना आणि जागा मालकांना विश्वासात घेऊन त्यांना पुनर्विकासाची संधी दिली जाणार आहे. शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथील रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. शहरात सुमारे ५ हजारांहुन अधिक वाहने ये-जा करीत असतात. त्यांच्या वाहतुकीसाठी शहरात केवळ दोनच मुख्य रस्ते अस्तित्वात असुन इतर अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे त्यांचे रुंदीकरण गरजेचे आहे.