शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलासाठी ‘भीख मांगो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:02 IST

पैसे सरकारला पाठवणार : आंदोलनास वाहनचालकांनी दिला पाठिंबा

कल्याण : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीख मांगो’ आंदोलन छेडले. जुना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शवला.

धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्य:स्थितीत बाजूकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी हा पूल अरुंद असल्याने तासन्तास वाहतूककोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाºया वाहनचालकांना करावा लागत आहे. जुन्या पुलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच ३० डिसेंबरला या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरुणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणेला सवाल केला होता. रविवारी स्थानिक नागरिकांनी पत्रीपूल परिसरात ‘भीख मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठवणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी आंदोलनाला पाठिंबा देत, लोकप्रतिनिधी आणि सरकारविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.पाच महिन्यांत पाच टक्केही काम नाहीच्पाच महिने उलटूनही पत्रीपुलाचे पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.च् नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे