शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर भेळ विकून कुटुंबाचा प्रपंच, नोकरी गेल्यावर व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:42 IST

ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अनेक वर्षे सायकलवर भेळ विकणारे विश्वास शिंगोटे यांची भेळ लोकप्रिय झाली आहे.

पंकज पाटील अंबरनाथ : ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता अनेक वर्षे सायकलवर भेळ विकणारे विश्वास शिंगोटे यांची भेळ लोकप्रिय झाली आहे. शिंगोटे हे सरकारी कार्यालयात येताच त्यांच्याकडून भेळ घेण्यासाठी गर्दी होते. फिरती देशी भेळ म्हणून ते नावारूपाला आले आहेत. दिवसभर भेळ विकून शिंगोटे हे आपला प्रपंच सांभाळत आहेत. नोकरी गमावल्यावर न डगमगता त्यांनी सुरू केलेला व्यवसाय आजही ते जिद्दीने सांभाळत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बदगी येथील शिंगोटे १९६६ च्या सुमारास मुंबईत नोकरीच्या शोधात आले आणि स्थायिक झाले. त्याकाळी अंबरनाथमध्ये स्वस्तिक कंपनी नावारूपाला आली होती. तेथे कुणालाही रोजगार मिळत असे. शिंगोटे यांच्या भावाने विश्वास यांना त्या कंपनीत नोकरी मिळवून दिली. मात्र, १९८७ मध्ये कंपनी बंद पडली. आता पुढे काय करायचे, असा यक्षप्रश्न उभा ठाकला. कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, असा साधा पेहराव असणाऱ्या शिंगोटे यांनी नोकरी मिळत नाही म्हणून न डगमगता एखादा परवडणारा व्यवसाय का करू नये, असा विचार केला. त्यांनी भेळीचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्यावेळी जवळ जास्त पैसे नसल्याने जागा कशी घ्यायची आणि व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न होताच. तरीही, प्राप्त परिस्थितीवर मात करून शिंगोटे यांनी सायकलीचा तोडगा काढला आणि सायकलवर भेळविक्रीचा व्यवसाय सुरू केला.हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी असा व्यवसाय करणाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली, पण माहिती द्यायला कुणीही तयार होईना, याची खंत शिंगोटे यांना सतावू लागली. याचवेळी हातगाडीवर चुरमुरे, शेव, कांदा, मिरचीची भेळ विकण्यास प्रारंभ केला. नंतर, सायकलला पिशव्या अडकवून भेळीचा व्यवसाय सुरू केला. टेस्टी भेळीमध्ये साधे चुरमुरे, शेव, शेंगदाणे, टोमॅटो आणि कुरकरीतपणा येण्यासाठी शिंगोटे फोडणीचे चुरमुरे वापरतात. नगरपालिका, तहसीलदार कार्यालयांबाहेर सायकल उभी केली की, भेळ खाण्यासाठी खवय्यांची रांग लागते. व्यवसायातून जास्त कमाई होत नसली, तरी दोनवेळचे पोटभर जेवण मिळते, असे त्यांनी सांगितले. शिंगोटे यांची मुलेही हा व्यवसाय करतात.