शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर ते मुंबई जलवाहतूक सेवा चालू होणार

By धीरज परब | Updated: February 12, 2023 14:30 IST

Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे . 

मीरारोड - मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे . 

भाईंदर वरून मुंबईसाठी जलवाहतूक सुरु करावी व उत्तम येथील समुद्रात जलक्रीडा सुरु करण्याची मागणी आ . जैन यांनी मेरीटाईम बोर्ड व शासना कडे चालवली आहे . त्या अनुषंगाने आ. जैन यांच्या मागणी वरून शुक्रवारी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या कडे शुक्रवारी बैठक झाली .  

त्यात हार्बर क्रूसने भाईंदर वरून जलवाहतूक सुरु करण्यासह भाईंदर ते वांद्रे सी लिंक पर्यंत लवकरच वॉटर टॅक्सी चालू करण्याबाबत आवश्यक पावले उचलण्याचा आदेश उपस्थित अधिकाऱ्याना डॉ . सैनी यांनी दिले .  येत्या आठ ते दहा महिन्यात सदरची वॉटर टॅक्सी सेवा चालू करण्याबाबत आपण स्वत: प्रयन्तशील राहू असे डॉ.सैनी यांनी आश्वस्त केले .  

तर मीरा भाईंदर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जल क्रीडा चालू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्याला आठवड्या भरात परवानगी देण्यात येईल असे डॉ.सैनी यांनी सांगितल्याची माहिती आ . जैन यांनी दिली .  बैठकीला मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी ,  महानगर पालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMumbaiमुंबई