शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना पडतोय भुर्दंड रुग्णवाहिकेचा खर्च, भार्इंदरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:06 IST

सरकारच्या रूग्णवाहिकेसाठी १०८ क्र मांक सतत लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने गरजू रूग्णांना नाईलाजाने अन्य रु ग्णवाहिकांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचा प्रकार भार्इंदरमध्ये घडला आहे.

भार्इंदर : सरकारच्या रूग्णवाहिकेसाठी १०८ क्र मांक सतत लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने गरजू रूग्णांना नाईलाजाने अन्य रु ग्णवाहिकांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचा प्रकार भार्इंदरमध्ये घडला आहे.गोल्डन नेस्ट येथे राहणाऱ्या उर्मिला गुप्ता यांना पती रवींद्र याने शनिवारी बेदम मारहाण केली. पतीच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून उर्मिलाने आपल्या माहेरच्यांना घटनेची माहिती दिली. जखमी उर्मिलासह तिचे माहेरचे नातलग व सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी नवघर पोलीस ठाणे गाठले.जबर मार लागलेल्या उर्मिला यांना सतत उलटी व चक्कर येत असल्याने महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रु ग्णालयात नेले. तेथे डॉक्टरने सिटी स्कॅन करावा लागेल व त्यासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात तातडीने न्या असा सल्ला दिला. नाईक यांनी सरकारच्या १०८ क्र मांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्कसाधला. पण सतत कॉल करूनही कोेणताच प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे पाऊण तास वाट पाहून अन्य रुग्णवाहिका पाहणे सुरु केले. खाजगी रुग्णवाहिकेसाठी बाराशे रुपये शुल्क सांगण्यात आले. शेवटी महापालिकेची रुग्णवाहिका घेतली. त्यासाठी त्यांना साडेतीनशे रुपये शुल्क भरावे लागले.गरजू वा अत्यवस्थ रुग्णांना जर १०८ क्रमांकाची विनामूल्य रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल करत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.या प्रकरणी आपण तक्र ार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. रूग्णालयातील अन्य लोकांनीही सरकारी रूग्णवाहिकेचा असाच अनुभव असल्याने अन्य रु ग्णवाहिका पैसे भरून घ्यावी लागत असल्याचे सांगितले असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :thaneठाणे