शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंंडीत विकासकाकडून ६० लाख मागीतल्याचा भाजप नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 21:46 IST

भिवंडी : शहरातील कामतघर येथील शामदनी हाईटच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळी करून २० लाखाची खंडणी उकळणाऱ्या तीन जणांविरोधात ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तीघांमध्ये भाजपाचे प्रभाग समितीचे सभापती व गट ...

ठळक मुद्देबिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळीसन २०१२-१३ सालापासून त्यांनी जुलूमाने २० लाख रूपये घेतलेठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार

भिवंडी : शहरातील कामतघर येथील शामदनी हाईटच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळी करून २० लाखाची खंडणी उकळणाऱ्या तीन जणांविरोधात ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तीघांमध्ये भाजपाचे प्रभाग समितीचे सभापती व गट नेत्याचा समावेश आहे.पोलीसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खबळ माजली आहे.आरोपींना अटक करू नये म्हणून पोलीसांवर दबाव तंत्र सुरू झाले आहे.शहरातील कामतघर परिसरांत मोठमोठे विकासकामे सुरू असुन आहेत.त्यापैकी शहरातील कासारआळी गोकुळनगर येथे रहाणारे बिल्डर विकासकुमार राठी यांनी कामतघर परिसरांत शामदनी हाईट या इमारतींचे सुरू केले आहे. ही कामे सुरू ठेवण्यासाठी महानगरपालिकेतील कामतघर भागातील स्थानिक नगरसेवक तथा भाजपा गटनेता निलेश हरिश्चंद्र चौधरी,प्रभाग समिती क्र.३ चे सभापती हनुमान चौधरी तसेच माजी नगरसेवकाचा भाऊ महेश पाटील यांनी राठी यांच्याकडून ६० लाख रूपयांची मागणी केली होती.त्यापैकी सन २०१२-१३ सालापासून त्यांनी जुलूमाने २० लाख रूपये घेतले आणि उरलेल्या रक्कमेची मागणी करीत त्यांनी वेळोवेळी शिवीगाळी करून मारहाण केली. तसेच इमारत बांधकाम व्यवसाय बंद पाडण्याची तसेच कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली,अशी तक्रार बिल्डर विकासकुमार राठी यांनी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार नारपोली पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवक निलेश चौधरी,हनुमान चौधरी व साथीदार महेश पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे ठाण्यानंतर भिवंडीतील बिल्डरांना धरून राजकारण करणाºया महानगरपालिकेतील गोल्डन गँगवरील पडदा लवकरच उठणार असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत.

 

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा