शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तहसीलदारांचे आदेश भाईंदर पालिकेने धुडकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:18 IST

बेकायदा बांधकामांवर कारवाई; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, भूमाफियांकडून अतिक्रमण

- धीरज परबभाईंदर: मीरा-भाईंदरमधील सरकारी जमिनींवर होणारे अतिक्रमण व बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांनी पालिकेस दिले आहेत. परंतु, पालिकेने कारवाईबाबत टाळटाळ केली.सरकारी जमिनींपैकी अनेक जमिनींवर विकास आराखड्यातील आरक्षणे टाकली आहेत. या जमिनींवर राजकारणी, भूमाफियांनी अतिक्रमण चालवले आहे. सरकारी जागा वा त्यावर बांधकामे करून त्याची सर्रास विक्री केली जाते. लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून सरकारी जागेतील बेकायदा बांधकामांना पालिका पाणी, स्वच्छतागृह, दिवाबत्ती, रस्ते, पदपथ, गटारे आदी सुविधा पुरवते.सरकारी जमीन असताना त्यावर होणाºया बेकायदा बांधकामांवर महापालिका कारवाई करत नाही. महसूल विभागास तुमच्या जागेत झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी वेळ ठरवावी, अशी पत्रे देऊन हात झटकले जातात. यादरम्यान बेकायदा बांधकामे उरकली जातात. वास्तविक, महसूल आणि मीठ विभागाकडे अतिक्रमण हटवण्याची यंत्रणा आणि मनुष्यबळ नसल्याची कल्पना असूनही पालिका कागदी घोडे नाचवत सरकारचे पत्रक असल्याचा हवाला देत आली आहे. पालिका, लोकप्रतिनिधींसह तलाठी, मंडळ अधिकारी आणि मीठ विभागाचे अधिकारीही जबाबदार आहेत. कारण, बेकायदा बांधकामे करणारे वा त्यात वास्तव्य करणाऱ्यांविरोधात नियमितपणे गुन्हे दाखल करण्यास सातत्याने टाळटाळ करत आली आहे. कारवाईच्यावेळीही ते जागेवर येत नाहीत.पालिका नेहमीच सरकारी जमीन म्हणून बेकायदा बांधकामांवर कारवाईस टाळटाळ करत आल्याने तहसीलदार अधिक पाटील यांनी पालिका उपायुक्तांना पत्र देऊन नियोजन प्राधिकरण म्हणून सरकारी जमिनींवर बांधकाम परवानगी देणे तसेच बेकायदा बांधकामांवर कारवाईची मूलभूत जबाबदारी पालिकेची असल्याचे कळवले आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी प्रभाग अधिकाºयांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून कारवाईसाठी नियुक्त केले आहे. उच्च न्यायालयानेही सरकारी जमिनींवरील बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी पालिकेला ढकलता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगत निर्देश दिले आहेत. परंतु, तहसीलदारांनी दिलेल्या पत्राला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवत सरकारी जमिनींवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.सरकारी जागेतील बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यांच्या जमिनींचे संरक्षण त्यांनी केले पाहिजे. सरकारचे तसे पत्र असून अतिक्रमण करणाºयांवर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. पण, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. त्यांना जेव्हा कारवाई करायची असेल, तेव्हा आम्ही यंत्रणा आणि मनुष्यबळ पुरवू. - दीपक पुजारी, उपायुक्तबेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका अधिनियमच्या कलम २६०, २६७ तसेच एमआरटीपी कायद्यातही कोणत्याही जमिनीवरील बेकायदा बांधकाम त्वरित तोडण्याची जबाबदारी पालिकेवर निश्चित केलेली आहे. उच्च न्यायालयानेही जमीन जरी जिल्हाधिकारी यांची असली, तरी कारवाईची जबाबदारी पालिका ढकलू शकत नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.- अ‍ॅड. सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक