शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक चांगल्या सुविधा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

By सुरेश लोखंडे | Updated: August 30, 2023 14:26 IST

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ...

सुरेश लोखंडे, ठाणे: जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन खेळाडूंसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईल, असे सांगून यावर्षी विशेष प्राविण्यप्राप्त १० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभले,मात्र पुढील वर्षी २० खेळाडूंचे सत्कार करण्याचे भाग्य लाभो. त्यासाठी असेच खेळत राहा अन् ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, अशी सदिच्छा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली.

क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त ठाणे जिल्ह्यातील मार्गदर्शक व खेळाडूंचा शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात शाल व सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार शिनगारे यांनी व्यक्त करुन जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

खेळाडू घडताना त्या खेळाडूच्या जिद्दीसोबत त्याच्या पालकांचा पाठिंबा आणि शासनाचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. ठाणे जिल्ह्यातील भावी खेळाडूंना शासकीय सुविधांची जोड मिळाल्यास आणखी प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, असं आश्वासन देऊन खेळाडूंकडून असलेल्या अपेक्षाही शिनगारे यांनी व्यक्त केल्या.

या सत्कार सोहळ्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या देखण्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रंगनाथ डुकरे आदी उपस्थित होते.

सन्मानित मार्गदर्शक व खेळाडूंची नावे-

सन २०१९-२०चा जीवनगौरव पुरस्कार- बॅडमिंटन- श्रीकांत शरदचंद्र वाडसन २०१९-२० चा क्रीडा मार्गदर्शक- कबड्डी- प्रशांत परशुराम चव्हाण

खेळाडू-1. सन २०१९- २० - चे - पॉवर लिफ्टिंग - नाजूका तातू घारे,शुटिंग‌: भक्ती भास्कर खामकर, कबड्डी:  सायली उदय जाधव (सध्या तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत)

2. २०२०-२१ चे - कबड्डी - निलेश तानाजी साळुंके,खो-खो- प्रियांका पंढरी भोपी,टेबल टेनिस- सिद्धेश मुकुंद पांडे, 

3. २०२१-२२  चे - पॉवर लिफ्टिंग- साहिल मंगेश उतेकर, मैदानी खेळ- प्रणव प्रशांत देसाई

टॅग्स :thaneठाणे