शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

रस्ते, रेल्वेला जलवाहतुकीचा सर्वाेत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:17 AM

कल्याणपासून सुरु झालेली खाडी ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, पुढे ठाणे

मुंबई उपनगराचा विचार केला तर बहुतांश शहरे ही खाडी किनाऱ्याला लागून आहेत. कल्याण खाडीला शिवरायांपासूनचा इतिहास आहे. दुर्गाडी मंदिराजवळ मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी मराठा आरमाराची स्थापना केली. तो ऐतिहासिक दुवा पकडला तर शिवकाळापासून कल्याण ते अलिबाग, ठाणे, वसई आणि मुंबई अशी जलवाहतूक केली जात होती. तेव्हा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची साधने विकसित झालेली नव्हती. रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधने आल्यावर जलवाहतूक मागे पडली. आता रस्ते व रेल्वे वाहतुकीवर पडणारा ताण पाहता आणि कोंडीवर उपाय म्हणून जलवाहतुकीचा पर्याय उत्तम होऊ शकतो.

कल्याणपासून सुरु झालेली खाडी ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, पुढे ठाणे, घोडबंदर, गायमुख, घोडबंदर तर दुसºया दिशेने नवी मुंईच्या दिशेने विस्तीर्ण होते. कल्याण ते ठाणे या प्रवासाचा विचार केला तर ठाण्याला रस्त्याने जाण्यासाठी कल्याणहून भिवंडी बायपासने जावे लागते. तर कल्याण- शीळ मार्गाने मुंब्रा बायपास रस्ता आहे. हे दोन्ही मार्ग बराच वळसा घालून जाणारे आहेत. रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. डोंबिवलीतील मोठा गाव ठाकुर्ली ते माणकोली खाडी पुलाचे काम डोंबिवलीच्या दिशेने पूर्ण करण्यात आले असले तरी भिवंडीच्या दिशेने हे काम सुरु नाही. अन्यथा डोंबिवली ते ठाणे हे अंतर अवघ्या २० मिनिटात कापले जाऊ शकते. मात्र कल्याण ते ठाणे रेल्वे समांतर मार्गाला समांतर रस्ता असावा अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. हा रस्ता ठाकुर्ली येथे अडकून पडला आहे. त्यामुळे कल्याण खाडीतून थेट ठाणे गाठण्यासाठी जलवाहतुकीचा मार्ग सुरु करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे.

ही मागणी केंद्र सरकार दरबारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लावून धरली होती. केवळ मागणी करून ही मंडळी गप्प बसली नाही. तर त्यांनी ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने कल्याण-ठाणे, ठाणे-वसई, ठाणे-नवी मुंबई आणि ठाणे- मीरा-भाईंदरच्या दिशेने जलवाहतूक सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. हा प्रकल्प अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला. त्यावर गडकरी यांनी त्याला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पास मंजूरी दिली गेली. पहिला टप्पा ६०० कोटींचा आहे. त्यापैकी ९० कोटी मंजूर झाले आहेत. या खर्चातून डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा-भाईंदर येथे जेटी बांधण्याचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १४ ठिकाणी जेटी बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी सगळ््यात प्रथम प्राधान्य डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा-भाईंदर येथे देण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून करण्यात येणार आहे. सध्या या बोर्डाकडून जलवाहतुकीची सेवा अन्य ठिकणी सुरू अहे. खाजगी कंपन्यांच्या मदतीने ही सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा बीओटी किंवा पीपीपी तत्त्वावर चालविण्याचे ठरविले जाईल. त्यासाठी स्वारस्य निविदा (एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागविल्या जातील असे त्याचे स्वरुप राहिल. चार ठिकाणी जेटी बांधण्यासाठी दोन महिन्यात निविदा मागविल्या जातील.पहिल्या टप्प्यात ठाणे- डोंबिवली असा प्रवास सुरू होईल. पहिल्या टप्प्यात डोंबिवली ते कल्याण हा मार्ग घेतलेला नाही. कारण कल्याण ते डोंबिवली दरम्यान खाडी काही अंशी खडकाळ आहे. हा खडक फोडावा लागणार असल्याने कल्याणचा विचार हा दुसºया टप्प्यात होणार आहे.कल्याण- डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत २५ प्रकल्प तयार करण्याची यादी तयार केला आहे. या अंतर्गत महापालिकेने वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. जलवाहतुकीसाठी कल्याणच्या खाडीजवळच बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांच्या विरोधात बेधडक कारवाई २०१६ मध्ये करण्यात आली. जवळपास ७२ कोटी रुपये खर्चाच्या क्रेन, बोटी, ड्रेझर्स गॅस कटर लावून तोडण्याची कारवाई केली होती. खाडीकिनारा अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता. मात्र वॉटर फ्रंंट डेव्हलपमेंटला चालना मिळालेली नाही. खाडीकिनाºयाचे सुशोभीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत करण्याचा सविस्तर अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या वतीने अद्याप करण्यात आलेला नाही. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचा भाग स्मार्ट सिटीच्या दुसºया टप्प्यात घेण्यात येणार आहे. कल्याण खाडीवर आजही खाजगी फेरीबोटीच्या फेºया सुरु आहेत. कल्याणचा गणेश घाट हा जलवाहतुकीचे भविष्यातील स्टेशन आहे. डोंबिवली खाडीकिनारा विकसित करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यतत्परता स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने दाखविली पाहिजे. कारण मेरीटाईम बोर्डाच्या वतीने निविदा मागवून डोंबिवली- ठाणे हा जलवाहतुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी जेटीचे बांधकाम सुरु केले जाणार आहे. डोंबिवली खाडीकिनारा सुशोभीत करण्याचे कामही होणे आवश्यक आहे.खाडीकिनाºयाचा फायदा करून घेणे गरजेचेठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीकिनाºयाचा फायदा हा जलवाहतुकीसाठी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वस्त आणि प्रदूषणविरहित ही वाहतूकसेवा असल्याने त्याचा सामान्यांना नक्कीच फायदा होईल.कोंडीत अडकून राहण्यापेक्षा नागरिक या सेवेला प्राधान्य देतील. यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे.दुसरा टप्पा असा असेलजलवाहतूक प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात साकेत-मांडला-तुर्भे-गेट वे मुंबई हा जलमार्ग व त्यालाच जोडून साकेत-वाशी-कर्वेनगर-सीबीडी असा असेल. साकेत ते गेटवे हा प्रवास ६४ मिनिटात पार करता येईल. तर साकेत ते सीबीडी हा प्रवास ५५ मिनिटात पार करता येईल. दुसºया टप्प्याच्या पूर्ततेनंतर इंटरसिटी जलवाहतूक सुरु केली जाईल. त्यात घोडबंदर-कोलशेत-साकेत-दिवा या मार्गाने जलवाहतूक सुरु केली जाईल. तसेच ठाणे-वसई, वसई-मीरा भाईंदर, ठाणे-भिवंडी, ठाणे-कल्याण, या मार्गांचाही समावेश राहणार आहे. जलवाहतुकीमुळे नागरिकांच्या वेळेची त्याचप्रमाणे इंधनाचाही बचत होणार असल्याने ही सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.ठाण्याला केंद्रभूतठेवून डिझाइनजलवाहतुकीचे डिझाईन ठाण्याला केंद्रभूत ठेवून करण्यात आले आहे. भविष्यात हा प्रकल्प अस्तित्वात आला तर डोंबिवली, दिवा, भिवंडी, ठाणे, वसई मीरा- भाईंदर, नवी मुंबई, मुंबई ही जलवाहतूक मार्गाने जोडली जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या चारही दिशा जलवाहतुकीने जोडल्या जातील. तसेच वाहतुकीस सक्षम पर्याय उपलब्ध होईल. जलवाहतुकीमुळे लवकर आणि कमी खर्चात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, तसेच वसई गाठता येईल. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. अर्थात आता हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास त्याचा निश्चितच फायदा नागरिक, प्रवाशांना होऊ शकतो.जलवाहतुकीचा नाही पत्ता, केवळ जेटी बांधण्याचीच घाईभार्इंदर रेल्वे मार्गाच्या पूर्व आणि पश्चिम खाडीकिनारी मागील ५ वर्षात मेरीटाईम बोर्डाने तब्बल तीन जेटी बांधल्या आहेत. जेसलपार्क येथे दोन तर पश्चिम धक्का येथे एक जेटी बांधली आहे. आधी बांधलेल्या एकाही जेटीचा जलवाहतुकीसाठी वापर होत नसताना बोर्डाने मात्र एकामागोमाग एक जेटी बांधण्याचा भन्नाट प्रकार चालवला आहे. कोट्यवधींचा खर्च वाया घालवला असून इतक्या गंभीर प्रकरणी सर्वच चिडीचूप आहेत कारण सर्वांच्याच तुंबड्या या अवास्तव खर्चात भरल्या नसतील तर नवल. भार्इंदरच्या वसई खाडीकिनारी जेसलपार्क येथे मेरीटाईम बोर्डाने चक्क कांदळवनाचा ºहास करुन खाडीपात्रात जेटी बांधली. विक्रमकुमार आयुक्त असताना त्यांनी खाडीत जलक्रीडा सुरु करण्याची मागणी केली होती.पण मूळात खाडीतील पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहता तसेच एकूणच या खाडीत जलक्रीडा काही सुरु झाली नाही. २०१५ मध्ये बांधलेल्या जेटीचा कोणत्याही प्रवासी जलवाहतुकीसाठीही आजतागायत वापर झालेला नाही. त्या जेटीचा वापर केवळ खाडीत निर्माल्यापासून विविध प्रकारचे साहित्य, फ्रेम, पुस्तके आदी अनेक प्रकार टाकण्यासाठीच होतो. नागरिक जेटीवर येऊन बसण्यासाठी वा सेल्फीसाठीच याचा वापर करत आले आहेत. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मूर्ती विसजर्नासाठी वापर केला जातो.लहान व महाविद्यालयाची मुले तर सर्रास जीव धोक्यात घालून येथे मौजमजा करताना दिसतात. पण त्यांच्या सुरक्षेची काळजी ना पालिकेला, नगरसेवकांना ना पोलिसांना पडलेली आहे.२०१५ मध्ये बांधलेल्या जेटीचा वापर होत नसताना मेरीटाईम बोर्डाने जेसलपार्कलाच आणखी एक जेटी २०१९ मध्ये बांधली. ही जेटीही कांदळवनात आणि खाडीपात्रात भराव करुन बांधली. मूळात २०१५ मध्ये बांधलेल्या जेटीचा वापरच होत नसताना आणखी एक जेटी बांधण्याचा उपदव्याप मेरीटाईम बोर्डाने मजा म्हणून केला का ? लाखो रुपयांचा खर्च आणखी एका जेटीसाठी करण्याचे कोणते कारण होते जे अजूनही बोर्डाने स्पष्ट केलेले नाही. या नवीन जेटीचा वापरही निर्माल्यापासून विविध प्रकारचे साहित्य टाकण्यासाठी तसेच गणपती, नवरात्रोत्सवात विसर्जनासाठी व छटपूजेसाठी केला

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका