शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला उत्पादनाचा कालावधी बदलल्याने फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:42 IST

विविध भाजीपाल्यांची लागवड; काकडी, मिरचीसोबतच कारल्याचेही घेतले उत्पादन

- जर्नादन भेरे भातसानगर : यंदा शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काकडीचे उत्पादन आले होते. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या काकडीच्या पिकावर अक्षरश: नांगर फिरवला होता. असे असले तरी तालुक्यातील सारमाळ येथील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी कालावधी बदलून काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पिकणाºया काकडीला चांगला भाव मिळत आहे.पती मंगेश पाटील यांच्या साथीने मनीषा या सात एकर शेतजमिनीत भाजीपाला पीक घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.पाटील यांनी कारली, अंतरपीक मिरची व झेंडूची फुले आणि दोन एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. दिवसाआड ९०० किलो मिरची बाजारात विक्रीसाठी जाते, तर ८०० ते ९०० किलो काकडी १२ ते १४ रु पये दराने बाजारात विकली जात आहे. हीच काकडी काही दिवसांपूर्वी दोन रु पये किलोने जात होती. दीड फुटांपर्यंतच्या कारल्याचे उत्पादन त्या घेत असून अंतरपीक मिर्चीतूनही त्यांना एक ते दीड लाखांचा नफा अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात काकडीच्या अधिक उत्पादनामुळे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी काकडी उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, कालावधी बदलून घेतलेल्या काकडी आणि मिरचीच्या उत्पादनातून दोन ते अडीच लाखांपर्यंत नफा मिळण्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.सेंद्रिय खतांमुळे शेतातच उठावसर्वच शेतात ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. तसेच सेंद्रिय खतांची जोड दिल्याने या हिरव्यागार भाजीपाल्याला शेतातच मागणी मिळत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. केवळ एकाच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून न राहता शेती केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाच्या उत्पादनामुळे एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तरी दुसºया पिकातून ते भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळत आहे.- विलास झुंजाराराव, कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी