शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात; पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 19:46 IST

पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.

- राजू काळेभाईंदर - पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वे स्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. हा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतुकीतून सुटका होणार असल्याचे एमएमआरडीएच्या सूत्राकडून सांगण्यात आले.या लिंक रोडचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएचं काम पाहणार असून, एमएमआरडीएकडूनच रोडच्या बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. रोडचे काम मात्र मीरा-भाईंदर महापालिकेकडून केले जाणार आहे. हा रस्ता भाईंदर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गाला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे जोडला जाणार आहे. तेथील राधास्वामी सत्संग व मिठागरापासून पुढे तो मीरा रोड रेल्वे स्थानकाकडे जाऊन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथून निर्गमित होणार आहे. या रोडचे अंतर सुमारे ५ ते ६ किलोमीटर इतके असून, त्याची रुंदी सुमारे ४५ ते ६० मीटर इतकी असणार आहे. त्यासाठी सुमारे ३०० ते ३५० कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी किमान २ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असला तरी तो भविष्यातील तांत्रिक अडचणींमुळे वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यास भाईंदर पूर्व व पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय उपलब्ध होऊन भाईंदर ते दहिसर दरम्यानचे मोठे अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असल्याने हा रोड भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र या नियोजित रोडच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात तिवरक्षेत्र असल्याने त्याच्या बांधकामात अडसर निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा अडसर पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच दूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या रोडच्या लगतच भाईंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते वसई येथे खाडीमार्गे जाणारा आणखी एक लिंक रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित लिंक रोडला नियोजित भाईंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोड जोडला जाणार असल्याने वसई-विरार येथील वाहतुकीला देखील मुंबईकडे जाण्यासाठी हा रोड महत्वाचा पर्याय ठरू शकणार आहे. याखेरीज भाईंदर पश्चिम ते वसई किल्ल्यादरम्यान रो-रो सेवेच्या जेट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने वसई-विरार ते मुंबईचे अंतर खूपच कमी होऊन मुंबई-अहमदाबाद महामार्गासह पश्चिम महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुसह्य होणार आहे.तसेच पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होऊन ती जलद होणार आहे. नियोजित भाईंदर ते दहिसर लिंक रोडवर टोलच्या धाडीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील टोलधाडीतून सुटका करुन घेण्यासाठी नियोजित लिंक रोडच्या वापरात सतत वाढ होणार आहे. हा रोड ६ ते ८ पदरी बांधण्यात येणार असल्याने यावरील वाहतूक कोंडी नगण्य ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या लिंक रोडला एमएमआरडीए प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या लिंक रोडचा वापर मीरा रोड येथील लोकांना करता यावा, यासाठी मीरा रोड पूर्व व पश्चिम बाजू जोडणाऱ्या उड्डाणपुलाची मागणी आ. नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएकडे केली होती. मात्र तेथे लोकवस्ती नसल्याच्या कारणास्तव सध्या त्या पुलाला एमएमआरडीएने तत्कालीन बैठकीत लाल दिवा दाखविला आहे.