शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पारसिक बोगद्यावरील कचरा हटवण्यास अखेर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:00 IST

कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेला कचरा अखेर ठाणे महापालिकेने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्यास सुरुवात केली आहे

ठाणे : कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेला कचरा अखेर ठाणे महापालिकेने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्यास सुरुवात केली आहे. आठ दिवसांत हा बोगदा स्वच्छ झालेला दिसेल, असा दावा पालिकेने केला आहे. वाघोबा, भास्करनगरच्या मधल्या जागेत लहान मुलांसाठी एक उद्यानही येथे भविष्यात साकारले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.भास्करनगर व वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागांत झोपड्यांचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. मागील कित्येक वर्षांपासून या बोगद्यावरील बाजूही कचऱ्याने भरलेली होती. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्यही येथे होते. काही वेळेस किरकोळ आगीच्या घटनाही या ठिकाणी घडल्या होत्या. या कचºयाचा बाजूने जाणाºया रेल्वेस त्रास होत होता. यामुळेच ही समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक महेश साळवी व इतर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. तसेच पाटील यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता. परंतु, हा कचरा हटवण्यासाठी साधे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार नव्हते. आता ही समस्या सुटली असून जर्मन तंत्रज्ञानाचे मशीन पालिकेच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे. त्याच्याच साहाय्याने १३ सप्टेंबरपासून तो उचलण्यास सुरुवात झाली आहे. बोगद्यावरील हा कचरा उचलल्यानंतर या भागात लहान मुलांसाठी एक उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच भास्करनगर आणि वाघोबानगर भागातील रहिवाशांना येजा करणेही सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत ही मोहीम पार पाडण्यासाठी उपायुक्त मनीष जोशी, बालाजी हळदेकर विशेष लक्ष ठेवून आहेत.भास्करनगर आणि वाघोबानगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागांत झोपड्यांचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. रेल्वे प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना कचºयाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नthaneठाणे