नवीन मॉडेल रस्ते विकसित करणे वाहतुक सुरळीत होण्यासाठी आणि पादचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी नवीन १० रस्ते मॉडेल रस्ते म्हणून प्रायोगिक तत्वावर विकसित करण्याचा मानस असून या रस्त्यांमध्ये सध्या कॅरेज वे सह बाजुला असणाऱ्या साईड शोल्डर व पदपथ सौंदर्यीकरणासह विकसित करण्यात येणार आहेत. तसेच बसथांबे, डीपी व एमटीएनएलचे बॉक्स स्थलांतरित करण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना सुरळीत व सुरक्षित चालता यावे, मार्किंग पेटींंग, दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, यांत्रिक पध्दतीने साफसफाई, रस्त्यावर कचरा आणि अनधिकृत पार्किंग होऊ नये यासाठी मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे. येत्या वर्षात २३ चौकांचे मजबुतीकरण करुन, फुटपाथलगत आणि डिव्हायडरमध्ये शोभिवंत झाडांच्या लागवडीतून सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे. यासाठी ५० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. डोंगरी पाडा, मुच्छला, ओवळा, भाईंदरपाडा, गायमुख घाट येथे बीओटी तत्वावर पाच पादचारी पुल उभारण्याचे काम सुरु असून यासाठी ३३.२७ कोटींचा खर्च अपेक्षित असून यंदा यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.टीडीआरच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण४० मीटर रुंदीचा घोडबंदर रोडवरील वेदांत हॉस्पिटल ते विहंग व्हॅली रस्ता, ४० मीटरचा भाईंदरपाडा येथील ट्रक टर्मिनस आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर रुंदीचा आनंदनगर खेळाचे मैदान आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर मार्केट आरक्षण क्र. २ पासून पोस्ट आॅफिस ते पार्कवूड कॉम्प्लेक्स, ३० मीटर होरायझन स्कुल ते विजय रेसिडेन्सी राणी खन्ना स्कुल, ४० मीटर रुंदीचा वाघबीळ रोड ते हिरानंदानी इस्टेट रस्ता, तुर्फेपाडा रस्ता आदी रस्ते या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. रस्ता रुंदीकरण व नुतनीकरण यंदाच्या अर्थसंकल्पात १२.१९ किमीच्या १६ रस्त्यांचे रुंदीकरण करुन त्याचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १२५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच विकास आराखड्यातील ५.९ किमीच्या दोन रस्त्यांसाठी ४० कोटी, युटीडब्ल्युटी व सिमेंट कॉंक्रिटीकरण पध्दतीने १६ किमीचे २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन असून त्यासाठी युटीडब्ल्युटी रस्त्यासाठी ५० कोटी व सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी १२ कोटींची तरतुद प्रस्तावित आहे.मेडीटेशन व होलिस्टिक सेंटरघोडबंदर येथील विजय विलास गृहनिर्माण प्रकल्पातून प्राप्त १५२० चौ.मी. क्षेत्राच्या सुविधा भूखंडावर होलिस्टिक सेंटर विकसित करण्यात येणार आहे. मॅटर्निटी होमसमावेशक आरक्षणाअंतर्गत कासारवडली येथे तळ अधिक चार मजले आणि श्रीनगर येथे देखील तळ अधिक सहा मजल्याची इमारत उभारली जाणार आहे.ज्येष्ठांचे नंदनवन (वृध्दाश्रम)पोखरण रोड नं. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर प्राप्त होणाऱ्या १२०० चौ. मी. सुविधा भुखंडावर बांधीव सुविधेअंतर्गत स्टेट आॅफ आर्ट सर्व सुविधांसहीत ज्येष्ठांचे नंदनवन उभारण्यात येणार आहे. सामाजिक सुविधांचा विकासआगरी, कोळी, आदिवासी सांस्कृतिक केंद्र घोडबंदर येथे, महिला व्यायामशाळा, अभ्यासिका व वाचनालय, नोकरदार महिलांसाठी घोडबंदर परिसरातील सुविधा भुखडांवर २०० नोकरदार महिलांसाठी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून हॉस्टेल व्यवस्था, कॅडबरी येथे मत्स्यालय विकसित करणे, पोखरण रस्ता क्र. २ येथील उर्वी पार्क या गृहनिर्माण संकुलातून सुविधा भूखंडावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासाठी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकास, पोखरण रोड नं. १ येथे ५० वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, हॉकर झोन, वर्तकनगर नाका येथे दुचाकी पार्किंग व शॉपिंग प्लाझा विकसित, जवाहरबाग स्मशानभूमी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित, कोलशेत रस्त्यालगत एव्हरेस्ट गृहनिर्माण प्रकल्पात भाजीपाला मार्केट व शॉपिंग सेंटर विकसित, बोरिवडे येथे मार्केट व लायब्ररी.४डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत महापालिकेच्या २७४ सफाई कामगारांसाठी २९० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. ४हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्यासाठी १० कोटी, ४बाळकुम येथे उभारण्यात येणाऱ्या आॅलिम्पिक धर्तीवर तरण तलावासाठी तीन कोटी, ४कोपरीत क्रीडा संकुल उभारण्यासाठी १.५० कोटी, ४लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.वर्तकनगर येथे मिनी मॉलपोखरण रोड नं. १ च्या रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या व्यावसायिकांसाठी वर्तकनगर नाक्यावर म्हाडाने महापालिकेला दिलेल्या भूखंडावर पीपीपीच्या माध्यमातून मिनी मॉल उभारण्यात येणार असून तेथे २५० दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी पाच कोटींची तरतुद प्रस्तावित असून एमएमआरडीएकडून व्यावसायिक दुकाने खरेदीसाठी ५ कोटी प्रस्तावित.उपकर ४.७५ कोटी, वृक्षारोपण निधी १.५० कोटी, व्याज १० लाख व इतर जमा एक लाख असे ७.५६ कोटी रु पये जमा होतील, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्यात महापालिकेकडून ९.२२ कोटी रु पये मिळतील, असे गृहीत धरण्यात आले आहेत. मृत झाडांचे कलात्मकरित्या सुशोभिकरण करण्याची कल्पना मांडणारा ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा १६. ७८ कोटींचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्प आरंभीची शिल्लक एक कोटी २० लाख इतकी आहे. खर्चात वृक्ष लागवड योजनेसाठी सहा कोटी, मृत वृक्षांच्या कलात्मक सुशोभीकरणासाठी १० लाख, रोपवाटिका विकास व झाडे खरेदीसाठी ३० लाख, खारफुटीची लागवड करण्यासाठी २० लाख, वृक्षगणनेसाठी ७५ लाख, वृक्षांच्या फांद्या उचलण्यासाठी एक कोटी, दुर्मिळ वृक्ष संवर्धनासाठी १० लाख, जैवविविधता वनासाठी २५ लाख, वृक्ष पुनर्रोपणासाठी एक कोटी तसेच वाहन खरेदीसाठी दोन कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. शिवाय स्थायी आस्थापना, कार्यालयीन खर्च, प्रदर्शने, गणवेश व इतर खर्च असा एकूण १६ कोटी ७८ लाखांचा हा अर्थसंकल्प आहे. पोखरण रोड नं. २ येथे कम्युनिटी पार्कपीजी केबल कंपनीच्या प्राप्त भुखंडापैकी ८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर कम्युनिटी पार्क कन्स्ट्रक्शन टीडीआरअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. येथे बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आहे. हिरानंदानी इस्टेट जवळ सदर्न पार्कबगीचा आरक्षण क्रमांक ९ चे तलावासह क्षेत्रफळ ५९००० चौरस मीटर असून पैकी ३५९०० चौरस मीटर बगिच्याचे क्षेत्रफळ आहे. येथे देखील टीडीआरच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. यात तलावाची स्वच्छता, कारंजी व उद्यानात गझीबो, स्कल्प्चर, अँम्फी थिएटर उभारण्यात येणार आहे.ब्रह्मांंड येथे पार्क (नॉर्दन पार्क)ब्रह्मांंड येथे २२ एकर जागेवर नॉर्दन पार्क उभारले जाणार असून त्याठिकाणी नेचर पार्क, नेचर ट्रेल, योग अभ्यासिका, प्रॉमिनाड, योगा सेंटर आदी उपलब्ध होणार आहे.सेंट्रल पार्क बाळकुम -कोलशेत रोड येथील ३० एकर परिसरावर सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार असून येथे जीम, स्केट पार्क, पार्किंग व्यवस्था, अॅम्फी थिएटर, जॉगिंंग ट्रॅक, तलाव निर्मिती, मैदानी खेळांसाठी जागा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागमध्यवर्ती पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा उभारणे, मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सोय, डायलिसीसची सुविधा, कॅन्सर निदान केंद्र, एमआरआय व सिटीस्कॅनची सुविधा, संसर्गजन्य रुग्णालयाची निर्मिती. ४महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नाचा विचार करता शहरातील महत्वाचे प्रकल्प आता कन्स्ट्रक्शन टीडीआर, पीपीपी व सीएसआरच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात येत आहेत. यामध्ये छोटी मलप्रक्रिया केंद्र, घनकचरा विकेंद्रीकरण, जाहिरातीचे हक्क देऊन चौकांचा व मोकळ्या जागांचा विकास, पादचारी पूल, सिटी स्कॅन व एमआरआय सुविधा, बायोमिथेनायझेन प्लॉंट, मलप्रक्रिया केंद्रातील सांडपाण्याचा पुनर्वापर, मृत जनावरे, कत्तलखान्यामधील कचरा, मार्केटमधील कचरा प्रक्रिया करुन उर्जा व बायोप्रॉडक्टचे उत्पादन, फायर अलर्ट, हॉट लाईन सिक्युरीटी, वेस्ट टु एनर्जी, सोलार पॉवर, मोफत वायफाय, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणी वितरण व्यवस्थेवर जलविद्युत प्रकल्प, स्मार्ट मीटर, ऊर्जा आॅडिट, वॉटर किआॅॅक्स, पाण्याचे आॅडीट आदींचा समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञानठाणे महापालिकेने ई गव्हर्नसच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली असून जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे, स्टार ग्रेड प्रणाली अमलात आणणे, टीएमटी इंटीग्रेटेड सिस्टीम, लेखा विभागातील टॅली प्रणालीमध्ये कामाच्या गरजेनुसार बदल करणे, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व वॉटर सप्लाय विभागातील ना हरकत दाखला देण्यासाठी प्रणाली तयार करणे, संगणक व इतर हार्डवेअर खरेदी, ई गव्हर्नसअंतर्गत आता महापालिकेच्या प्रत्येक सेवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून ठाणेकरांना घरबसल्या मिळाव्यात यासाठी या अॅपचा वापर केला जाणार आहे. १६ सेवांची आॅनलाईन उपलब्धता करुन देण्यावर त्यात भर असेल. सार्वजनिक वाचनालयात अंध व्यक्तींकरिता आॅडिओ लायब्ररी, उत्पन्नाच्या अटीवर घरकुलासाठी २५ हजाराचे अर्थसहाय्य, शॉपींग मॉल, मंडया आदी ठिकाणी अपंगांना स्टॉल उभारण्यासाठी अर्थसहाय्य, रात्र निवारा केंद्रात अपंगांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, बेटी बचाव योजनेअंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अपंग कुटुंबास अर्थसहाय्य, ६० वर्षावरील अपंगांना पेन्शन योजना, अपंग बेरोजगारांना भत्ता, अपंगांना विविध व्यावसायाचे प्रशिक्षण देणे आदींसाठी ८.५० कोटींची भरीव तरतूद प्रस्तावित.घनकचरा विभागविकेंद्रीत व कचऱ्याच्या प्रकारानुसार कचऱ्याची विल्हेवाट, मल्टीपर्पज एक्सकॅव्हेटर, स्टेशनरी कॉम्पक्टर आदींसाठी ३.५० कोटी, यंत्राद्वारे कचऱ्याचे विभक्तीकरण (रोबोटीक यंत्रणा) यासाठी ३ कोटी, घनकचरा संकलन व वाहतुक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ५० कोटी, शुन्य कचरा मोहीमेसाठी २५ लाख, हजेरी पेट्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी २५ लाख, शहर हागणदारी मुक्त करतांना ७१ हजार कुटुंबाकडे वैयक्तिक, सामूहिक आणि सार्वजनिक शौचालयांची उभारणी, महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, यंत्राद्वारे सार्वजनिक रस्त्यांची सफाई करतांना रोबोटीक मशिनचा आसरा घेतला जाणार असून यासाठी १२ कोटी, सफाई मार्शल, हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार करणे, कळवा रुग्णालयात बायोमिथेनायझेशन प्लॉन्ट, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती, ई कचऱ्याची विल्हेवाट, मृत जनावरे, कत्तलखान्यामधील कचरा, फिश मार्केट, मटण मार्केट, पोल्ट्री येथील कचऱ्यावर प्रक्रिया करुन एनर्जी व बायोप्रॉडक्टची निर्मिती, टाकाऊ कचऱ्याचा पुनर्वापर, स्वच्छ भारत अभियानांंतर्गत विविध कामे करण.प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसनरस्ता रुंदीकरण व मिसिंग लिंकचा विकास करतांना बाधीतांचे पुनर्वसन करण्यासाठी परवडणाऱ्या घरांच्या योजनेतून ८५५ घरे, हाऊसिंग फॉर आॅल मधून ४९७, बीएसयुपीमधून १४२५ आणि रेंटल मधून ३६०० घरे येत्या वर्षभरात प्राप्त होणार असल्याने तेथे बाधीतांचे पुनर्वसन केले जाणार आहे. कोकणीपाडा येथे प्रकल्प बाधीतांसाठी ३५८ घरे आणि ४३ वाणिज्य गाळ्यांसाठी ८ इमारती, घोडबंदर रोड येथे बेघरांसाठी ५१ सदनिका, कोलशेत येथे बेघरांसाठी ८८ सदनिका, म्युनिसिपल हौसिंग आरक्षणाचा विकास - चिरागनगर येथील परिसरात २०० सदनिका पार्किंग व्यवस्थेसह महापालिकेला मिळणार आहेत. इनलॅँड वॉटर ट्रान्सपोर्ट (जेटी सुविधा)खाडीत आता हा प्रकल्प उभारण्याचे पालिकेने प्रस्तावित केले असून बीओटी किंवा पीपीपी तत्वावर प्रतिसाद न मिळाल्यास पालिका निधीतून हे काम करण्याचे नियोजन असून यासाठी ५ कोटी.ठाणे शहरातील सांस्कृतिक वास्तु असलेल्या गडकरी रंगायतनचे नुतनीकरण व विद्युतीकरण करण्यासाठी
सुंदर रस्ते, नवी उद्याने, तलावांचेही संवर्धन होणार!
By admin | Updated: February 17, 2016 01:51 IST