ठाणे : लोकमत आणि बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड यांच्या वतीने विष्णुजी की रसोई कल्याण येथे ‘जाणाल तेव्हाच मानाल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गुंतवणूक तज्ज्ञ सुयोग काळे आणि रिजनल बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे हेड अमित मांजरेकर यांनी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचे मार्गदर्शन केले. आपला पैसा हा विविध ठिकाणी उपयोगी येणार आहे. पैसा लिक्विड फंड, डेब्ट फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवता येतो. पैसा बँकेत किंवा घरात नुसताच ठेवला तर त्याचे खरे मूल्य आपल्याला मिळत नाही. तोही कार्यरत राहिला पाहिजे.गुंतवणूक टिप्सम्युच्युअल फंड फक्त जोखीम नाही. ही लाँगटर्म इन्व्हेस्टमेंट आहे. सेन्सेक्स रोज बघू नका, तो सट्टा नाही, वेळ द्यावा लागेल. ब्रोकरने सांगितले म्हणून इन्व्हेस्टमेंट करू नका, बेस्ट फरफॉर्मन्स फंडचा अभ्यास करा. तुमच्या गुंतवणूकीची ओळख ओळखून गुंतवणूक करा. गुंतवणूकीत हाय रिस्क, हाय रिटर्न हा फंडा आहे.याप्रसंगी गुंतवणुकीसंदर्भात छोट्या व्हिडिओ क्लिप्स दाखविण्यात आल्या. अतिशय सोप्या पद्धतीने म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचे सूत्र समजून सांगितले. श्रोत्यांच्या शंकांचे निरसन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सांगता विष्णुजी की रसोईमधील भोजनाचा आस्वादाने झाली.कुणाल रेगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंड ही गुंतवणूक क्षेत्राला मिळालेली सुंदर देणगी
By admin | Updated: February 7, 2017 04:02 IST