शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

By अजित मांडके | Updated: April 20, 2024 15:42 IST

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी , तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई  करण्यात आली.  उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर, ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक  आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली.तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणा-या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवादरस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रूंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे हा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली, याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका