शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दाढी १०० रुपये, तर कटिंग १५० रुपये ! कोरोनाकाळात खर्च वाढला, दरही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:26 IST

Thane News : अनलॉकनंतर शहरातील केशकर्तनालये अटी आणि शर्तीने खुली झाली आहेत. परंतु, सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने दाढीसाठी १०० रुपये तर, कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. 

- कुलदीप घायवट कल्याण - लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद राहिल्याने केशकर्तनालय व्यवसायाचे तीनतेरा वाजले. आता अनलॉकनंतर शहरातील केशकर्तनालये अटी आणि शर्तीने खुली झाली आहेत. परंतु, सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने दाढीसाठी १०० रुपये तर, कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. लॉकडाऊनमध्ये कोलमडलेल्या व्यवसायाला सध्या पुन्हा उभारी दिली जात आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील १०० टक्के केशकर्तनालये खुली करण्यात आली आहेत. कटिंग आणि दाढीच्या दरांत वाढ झाली असली तरी, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम आणि अटींचे पालन करताना  या व्यवसायातील खर्चही  वाढला आहे.   

थर्मल स्क्रीनिंग तसेच सॅनिटायझरने हात धुऊन अनेक दुकानांत प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनमध्ये केस कापण्यासाठी फोन येत होते. आम्ही स्वतःची काळजी घेत नेहमीच्या ग्राहकांचे केस घरी जाऊन कापले, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली. लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात १७ व्यावसायिकांनी आत्महत्या केली. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळत असताना सुरक्षेच्या साधनांचा वापर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. - अनिल पंडित, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते काळजी  

संसर्ग टाळण्यासाठी सलूनमध्ये सॅनिटायझर, सोडियम क्लोराइड, मास्क, डिस्पोजेबल कापड, टॉवेलचा वापर केला जातो. अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकाला बोलावले जाते. सेवेनंतर डिस्पोजेबल कापडाची तसेच मास्कची योग्य विल्हेवाट लावली जाते.  

व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढ   केशकर्तनालयाच्या मालकाला पगारावर कारागीर मिळत नाहीत. दरडोई प्रत्येक सेवेसाठी ५० टक्के कामगार घेतात. २० टक्के खर्च करून मालकाला ३० टक्के मिळतात. दरवाढ असली तरी, खर्चही तेवढाच वाढला आहे. कटिंगसाठी वापरले जाणारे डिस्पोजेबल अ‍ॅप्रॉन, डिस्पोजेबल टॉवेलच्या किटची किंमत १५ रुपये आहे. स्वच्छतेसह मेंटेनन्स खर्च वाढला आहे. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण